Newly married couple in rajkot Fire Esakal
देश

Rajkot Fire: राजकोट अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, नवविवाहित जोडपे अजूनही बेपत्ता

Gaming Zone Fire: एका व्यक्तीने सांगितले की, गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे,

आशुतोष मसगौंडे

25 मे रोजी संध्याकाळी राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण देश हादरला आहे. घटनास्थळावरून 28 मृतदेह सापडले असून 33 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. पीडित मुलांचे कुटुंबीय रुग्णालयाबाहेर आपल्या प्रियजनांची वाट आहेत.

असाच एक पीडित प्रदीप सिंह चौहान राजकोट सिव्हिल हॉस्पिटलबाहेर आपल्या बेपत्ता नातेवाईकांची वाट पाहत होता. प्रदीप सिंह चौहान म्हणतात की गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे.

ठार झालेल्यांमध्ये प्रदीप यांचा १५ वर्षांचा मुलगा, त्याचा मेहुणा आणि बहिणीच्या कुटुंबाचा समावेश आहे. "माझ्या कुटुंबातील दोन मुले गेमिंग झोनच्या दुसऱ्या मजल्यावर होती, पण ते तिथून बाहेर पडू शकले नाहीत," असे प्रदीप म्हणाले.

नवविवाहित जोडपे बेपत्ता अजूनही बेपत्ता

याशिवाय या अपघातात नवविवाहित जोडपे २६ वर्षीय विवेक आणि २४ वर्षीय खुशाली यांचा समावेश आहे. मात्र, अपघातानंतर हे दोघेही बेपत्ता आहेत. दोघांचेही दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दोघांच्या कुटुंबीयांना त्यांच्या परतीची आशा आहे.

मूळ राजकोटचा असलेला अक्षय ढोलारिया नोकरीनिमित्त कॅनडात स्थायीक झाला होता.ख्याती सावलीया या मुलीशी गेल्या 10 दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.

या भीषण अपघातातील मृतांची संख्या २८ वर पोहोचली आहे. गंभीररित्या जळालेल्या मृतदेहांची ओळख पटू शकत नाही, त्यामुळे डीएनए चाचणी आवश्यक आहे. डीएनए चाचणी करण्यासाठी प्रशासनाला वेळ लागणार आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी बेपत्ता लोकांची यादी तयार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedarnath: आता केदारनाथ दर्शन आणखी सोपे होणार! ८ तासांचा प्रवास केवळ ३६ मिनिटांत, नवीन प्रकल्पाला सुरूवात, पाहा व्हिडिओ

Ohh Shit...! पाकिस्तान संघाचा टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले अन् शुभमनची डोकेदुखी वाढवली

IRCTC Diwali Scam : दिवाळीला घरी जाताय? रेल्वेचं तिकीट बूक करताना 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवाच, नाहीतर बनावट एजंट तुम्हाला लुटतील

MP Sanjay kaka Patil : नौटंकी करणे माझ्या रक्तात नाही, अजित दादांच्या माजी खासदारांने सरकारला सुनावलं

JioHotstar बंद पडलं! Network Error मुळे संतापले युजर्स, कंपनीने सांगितलं धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT