RAJNATH SINGH ESAKAL
देश

Parliament Session: लोकसभेत राजनाथ सिंह नाराज, समोरची खुर्ची सोडून गेले मागे

विरोधकांच्या सभागृहातील गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष नाराज झाले होते, त्यांनी सभागृहात येण्यासही नकार दिला होतो

सकाळ डिजिटल टीम

Parliament Session:

नवी दिल्ली- लोकसभेत विरोधकांचा गोंधळ अद्यापही सुरुच आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या राजनाथ सिंहाना आपली समोरची खुर्ची सोडून पाठीमागील खुर्चीवर जाऊन विधेयक सादर करण्याची वेळ आली. याआधी विरोधकांच्या सभागृहातील गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष नाराज झाले होते, त्यांनी सभागृहात येण्यासही नकार दिला होतो. त्यानंतर आता राजनाथ सिंहांनीही विरोधकांच्या गोंधळामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभेत विधेयक सादर करुन त्यावर राजनाथ सिंह बोलणार होते, पण विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोधकांनी सभागृहाच्या मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी अध्यक्षांनी विधेयक सादर करण्यास सांगितले तेव्हा सिंह यांनी पाठीमागे जाऊ देण्याची विनंती केली. राजनाथ सिंह म्हणाले की, महोदय समोर मोठा गोंधळ होत आहे. त्यामुळे परवानगी असेल तर मी पाठीमागे जाऊन माझं म्हणणं मांडू इच्छीतो.

महोदय, अशा गोंधळाच्या परिस्थितीत माझ्याकडून मुद्दा मांडणं अशक्य आहे. मी याठिकाणी बोलू शकत नाही, असं सिंह म्हणाले. त्यांनी उपाध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांच्याकडे पाठीमागे जाऊ देण्याची विनंती केली. सिंह पाठीमागे जात होते तेव्हा अनेक खासदारांनी त्यांना आपली खुर्ची देण्याची तयारी दाखवली, पण त्यांनी पाठीमागे जाऊन संसदेत आपलं म्हणणं मांडलं. यानंतर अग्रवाल यांनीही विरोधकांच्या वागण्यावर टीका केली. एखाद्याला पाठीमागे जाऊन बोलावं लागणं योग्य नाही असं ते म्हणाले.

लष्कर सुरक्षेसंबंधी विधेयक सिंह यांनी लोकसभेत मांडलं. ते म्हणाले की, 'देशातील लष्कर सुधारणेत आपण एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. हे विधेयक आपल्या तिन्ही दलांना सक्षम करेल. तसेच त्यांचे एकीकरण आणि एकजुटता वाढवेल. त्यामुळे भविष्यातील आव्हानांना आपण सक्षमपणे सामोरे जाऊ शकू'. दरम्यान, विरोधकांनी मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन लोकसभेत गोंधळ घालणे सुरुच ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

IND vs WI, 1st Test Video: ध्रुव जुरेलच्या विकेटकिपिंगने जिंकली मनं! सूर मारत चेंडू आडवत टीकाकारांना दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT