देश

देशातील सुरक्षा व्यवस्थेचा राजनाथसिंहांकडून आढावा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज पंजाबसह देशभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

पंजाबमध्ये काल झालेला ग्रेनेड हल्ला हा दहशतवादी संघटनांकडून करण्यात आल्याचा दावा केला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालय आणि सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजनाथसिंह यांना माहिती दिली. अमृतसरमध्ये निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे गृहमंत्रालयासह सुरक्षा दले दक्ष झाली असून, राजधानी दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

या हल्ल्याच्या मागे असलेल्यांचा शोध घेण्यासाठी पंजाब सरकारला सर्व प्रकारचे सहकार्य पुरविण्याच्या सूचना राजनाथसिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या एका पथकाने अमृतसरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केल्याचे अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना सांगितले. अमृतसरमधील धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या नागरिकांना ग्रेनेड हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. त्यात तीन जण मृत्युमुखी पडले होते, तर 20 जण जखमी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT