rajnath singh 
देश

राफेलवर ‘ॐ’ नाही तर काय लिहायचे? - राजनाथ

एएनआय

भिवानी (हरियाना) - ‘राफेल’ या लढाऊ विमानांच्या पूजेवरून विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर प्रतिहल्ला चढविला. या लढाऊ विमानाच्या दर्शनी भागामध्ये राजनाथ यांनी ‘ओम’ हा शब्द लिहिल्याने विरोधक संतापले होते. यावर राजनाथ यांनीच तेथे ‘ओम’ हा शब्द नाही तर अन्य काय लिहायला हवे होते, असा प्रतिसवाल राहुल यांना सभेत केला.

राजनाथ म्हणाले, ‘विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन करणे ही आपली परंपरा असून, मी राफेल विमानावर ओम हा शब्द लिहिला तेव्हा काही लोकांनी मी हाच शब्द का लिहिला म्हणून आक्षेप घेतला. मी राहुल यांना विचारू इच्छितो की तेथे ‘ओम’ नाही तर अन्य कोणता शब्द लिहायला हवा होता?’’ काश्‍मीरच्या मुद्द्यावरूनदेखील राजनाथ यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने काश्‍मीरची समस्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली. प्रत्यक्षात हा मुद्दा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ले करत असताना मानवी अधिकारांचे उल्लंघन होत नाही का, तेव्हा काँग्रेसचे नेते चकार शब्ददेखील का काढत नाही, असेही त्यांनी विचारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT