देश

राज्यसभा निवडणूक : महाराष्ट्रातून रजनी पाटील काँग्रेसच्या उमेदवार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेमध्ये रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून कुणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं. काँग्रेसकडून आता या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून राज्यसभेवर रजनी पाटील यांचं नाव उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आहे. याबाबत एक पत्रक काढून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून मुकूल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा होती. त्यात रजनी पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात होतं. त्यानुसारच आता त्यांची ही उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत रजनी पाटील?

  • रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. रजनी पाटील ह्या सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत.

  • त्या आधीही राज्यसभेवर होत्या.

  • त्यांना पुन्हा संधी देण्यात आलीय.

  • विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही रजनी पाटील यांचं नाव; मात्र निर्णय अजून राज्यपालांकडे प्रलंबित

  • भाजपानं राज्यसभेच्या एका जागेची निवडणूक लढण्याची केलीय घोषणा; संजय उपाध्याय यांना उमेदवारी

  • 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT