Ashok Gehlot criticism on Congress leader Sachin Pilot 
देश

Rajsthan Govt: महिला अत्याचारासंदर्भात राजस्थान सरकारचं मोठं पाऊल; "आरोपींना आता..."; CM गेहलोत यांची घोषणा

गेहलोत यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जयपूर : महिला अत्याचारासंदर्भात राजस्थान सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. त्यानुसार अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या आणि दोषींना एका मोठ्या गोष्टीला मुकावं लागणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याची घोषणा केली आहे. (Rajsthan Govt taken big step regarding women atrocities announcement of CM Ashok Gehlot)

गेहलोत यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की, राज्य सरकारनं एक निर्णय घेतला आहे की अल्पवयीन मुली आणि महिलांशी छेडछाड, अत्याचाराचा प्रयत्न करणारे तसेच त्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या आरोपींना आणि दोषींना सरकारी नोकरीपासून प्रतिबंधित करण्यात येणार आहे. त्यासाठी गुन्हेगारांप्रमाणं महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या पुरुषांचं पोलीस ठाण्यांमध्ये रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे.

तसेच राज्य सरकार आणि पोलिसांद्वारे देण्यात येणाऱ्या चरित्र प्रमाणपत्रांवरही याची नोंद करण्यात येणार आहे. अशा समाजविघातक तत्वांचा सामाजिक बहिष्कार करणं गरजेचं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महिला अत्याचारांसंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात राजस्थानातील जोधपूरमध्ये एका १७ वर्षीय दलित मुलीवर तीन जणांकडून सामुहिक बलात्कार झाला होता. आरोपींनी तिच्या प्रियकराला मारहाण करत मुलीवर आळीपाळीनं अत्याचार केला होता.

पण पोलिसांनी काही वेळातच आरोपींना अटक केली होती. आरोपी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असल्याचं समोर आलं होतं. मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनानंतर राजस्थानातील या घटनेवरुनही सरकारला टार्गेट करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT