Death Sakal
देश

'LOVE YOU बाबा' असा मेसेज पाठवत अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या

मुलगी तीच्या रुममध्ये एकटीच झोपली होती आणि सकाळी उठून तीने वडिलांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला.

दत्ता लवांडे

अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने बुधवारी आत्महत्या केल्याची घटना घडला आहे. बुधवारी एका तळ्यात त्याचे मृतदेह आढळले आहेत. आत्महत्या करणारा मुलगा हा १६ वर्षाचा असून तो ११ वी मध्ये शिकत आहे आणि मुलगी आठवीत शिकत असून ती १४ वर्षाची आहे. सदर अल्पवयीन मुलीने सोमवारी घर सोडलं होतं आणि "आय लव्ह यू पापा. मी तुम्हाला सगळ्यांना सोडून जात आहे पण तुमची सतत आठवण येत राहील." असा मेसेज तीने तीच्या वडीलांच्या फोनवर केला होता. त्यानंतर त्या प्रेमीयुगुलाचे मृतदेह शहरातील एका तळ्यात आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली असून यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाविरोधात सवार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रेमीयुगुलाचे मृतदोह आढळले आहेत. शहरातील तळ्यात दोन मृतदेह आढळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान मुलींच्या कुटुंबियांनी रिपोर्टमध्ये म्हटलंय की, मुलगी तीच्या रुममध्ये एकटीच झोपली होती आणि सोमवारी सकाळी तीने वडिलांच्या मोबाईलवर "मी तुम्हाला कायमचं सोडून जात आहे, मुलाच्या कुटुंबियांना काही बोलू नका." असा मेसेज पाठवला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा मेसेज पाठवल्यानंतर मुलीचा मोबाईल बंद झाला होता आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

सदर प्रकरणाचा तपास सुरु असताना त्यांचे मृतदेह आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच पुढील तपास सुरु असल्याचं DSP खेव सिंग यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT