rakesh tikait File Photo
देश

शेतकरी आंदोलन: ममता बॅनर्जींना भेटणार राकेश टिकैत; काय असेल पुढची दिशा?

विनायक होगाडे

कोलकाता : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकाता येथे जाऊन भेटणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाची धार अधिक वाढवण्यासाठी तसेच सरकारला घेरण्यासाठीच्या रणनीतीबाबत चर्चा करतील. या भेटीआधी शेतकरी नेता राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, आज दुपारी तीन वाजता ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतील. या दरम्यान त्यांच्यात कृषी, आरोग्य, शिक्षा आणि इतर स्थानिक मुद्यांवर चर्चा होईल.

भारतीय किसान युनियनच्या नेत्यांनी म्हटलंय की, बंगाल सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसोबत नियमितपणे चर्चा केली पाहिजे. उत्तर प्रदेशात प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीचा हवाला देत त्यांनी म्हटलंय की, ही नीती देशात सगळीकडे लागू व्हायला हवी.

टीएमसीसाठी केला होता टिकैत यांनी प्रचार

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाची धार वाढवण्यासाठी टिकैत प्रयत्न करत आहेत. आजची भेट हा याच प्रयत्नाचा भाग आहे. याआधी यावर्षीच्या मार्च-एप्रिलमध्ये बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी तृणमूल काँग्रेससाठी प्रचार देखील केला होता. यासोबतच ममता बॅनर्जींनी देखील वेळोवेळी या शेतकरी आंदोलनाच्या बाजूनेच आवाज उठवला आहे. तृणमूलचे अनेक खासदार देखील दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी हजर राहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price India : सोन्याचे दर उतरणार! सोने १६०० तर चांदी ७ हजारांनी स्वस्त, आठवड्याची सुरुवात कशी असणार

US airstrikes on ISIS : अमेरिकेचा सिरियातील ISISI च्या ठिकाणांवर हल्ला, VIDEO समोर...

Viral Video : माणुसकीला लाज आणली ! दारात भीक मागायला आलेल्या महिलेसोबत धक्कादायक कृत्य, व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल संताप

PM Vishwakarma Yojana : सरकारी योजनेत व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण अन् स्वस्तात कर्ज मिळवण्याची संधी, कोणाला मिळेल लाभ? जाणून घ्या

Panchang 11 January 2026: आजच्या दिवशी सूर्यकवच स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT