rakesh tikait 
देश

"राकेश टिकैत तालिबान्यांच्या पावलावर पाऊल टाकताहेत"

भारतीय किसान युनियनच्या भानू गटाचे अध्यक्ष भानुप्रताप सिंह यांच्याकडून गंभीर आरोप

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनच्या टिकैत गटाकडून आज (सोमवार) भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदला मोठ्या प्रमाणावर विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला असून दिल्लीच्या सीमाभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरु असल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनच्या भानू गटाचे अध्यक्ष भानुप्रतास सिंह यांनी या भारत बंदला विरोध केला असून राकेश टिकैत तालिबान्यांच्या पावलावर पाऊल टाकत दहशतवाद्यांसारख्या कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

भानुप्रताप सिंह म्हणाले, "भारत बंदचा काय फायदा आहे, मला हे विचारायचं आहे. जे भारत बंदची घोषणा करत आहेत त्यांनी हे तर सांगाव की यामुळे शेतकऱ्यांच्या कोणत्या फायद्यासाठी हे करत आहेत. ज्या प्रकारे दहशतवादी संघटना तसेच तालिबानी संघटनांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. त्यासारख्या घडामोडींना हे प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे बीकेयुच्या भानू गटाकडून मी सर्व पदाधिकाऱ्यांना ब्लॉकपासून देशापर्यंत सर्व व्यवस्थांना आवाहन करतो की, कोणीही भारत बंदला पाठिंबा देऊ नये, भारत बंदला सर्वांनी विरोध करावा. तसेच सरकारलाही मी आवाहन करु इच्छितो की अशा संघटना ज्या २६ जानेवारीपासून आत्तापर्यंत आपण पाहत आहोत, हे (टिकैत) दहशतवादी कारवायांमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्याकडे सरकारने लक्ष द्यावं, त्यांना सरकारने दाबण्याचा प्रयत्न करावा. भानू प्रताप सिंहचं हे उत्तर प्रदेश सरकार तसेच देशातील सर्वच सरकारांसह केंद्र सरकारला आवाहन आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी देशभरात आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदमध्ये शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या महामार्गांवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय रेल्वे मार्गही रोखणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. दिल्लीत या पार्श्वभूमीवर गाझीपूर सीमेवर वाहतूक बंद करण्यात आली आहे.

या भारत बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. यामध्ये पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT