Rakesh Jhunjhunwala pm modi Viral Photo 
देश

Rakesh Zunzunwala : मोदींशी भेट अन् चुरगळलेला शर्ट, काय होतं झुनझुनवाला यांच्या Viral Photo मागचं रहस्य

राकेश झुनझुनवाला यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

सकाळ डिजिटल टीम

स्टॉक मार्केटमध्ये बिग बुल म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर आता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. राकेश झुनझुनवाला अदम्य होते. जीवनाने परिपूर्ण, विनोदी आणि अभ्यासपूर्ण, त्यांनी आर्थिक जगामध्ये अमिट योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीबद्दलही ते खूप उत्कट होते, असं ते म्हणालेत.

दरम्यान, राकेश झुनझुनवाला यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या दोघांच्या भेटीचा एक फोटोही समोर आला होता. या फोटोवरून अनेक चर्चांना उधाण आलं होतं. या फोटोमध्ये राकेश झुनझुनवाला बसले होते आणि पीएम मोदी उभे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे झुनझुनवाला उठू शकत नसल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर राजकीय क्षेत्रात अनेक चर्चा रंगल्या होत्या.

दरम्यान, राकेश झुनझुनवाला यांनी एका हिंदी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचा संदर्भ उलगडला आहे. यात त्यांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या पत्नी रेखा यांच्या विनंतीवरून पंतप्रधान मोदी त्यांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी हा फोटो काढला होता. ते लिहतात की, 'जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांची नम्रता पाहून मला आश्चर्य वाटले. 18 ते 20 तास काम करूनही त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही कंटाळा दिसून आला नव्हता.

यावेळी माझ्या पत्नीने त्यांना फोटो काढण्याची विनंती केली होती. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली होती आणि मला उठून बसायलाही मदत केली होती. त्यानंतर आम्ही एक फोटो काढला. या त्यांच्या छोट्याशा घटनेतून त्यांचा विनम्र स्वभाव दिसून आला. त्यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला असा स्वभाव असणे सोपे नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या होत्या. राकेश झुनझुनवाला यांनी सुरुकत्या पडलेल्या शर्ट का घातला होता ? असा प्रश्न विचारत त्यांना ट्रोल केले होते. यावर राकेश झुनझुनवाला म्हणाले होते, 'मी 600 रुपये देऊन शर्टला प्रसे केली होती पण तरीही तो खराब आणि चुरघळल्यासारखा दिसत होता. अनेकदा आपण गाडीतून प्रवास करतो किंवा कुठेतरी बसतो त्यावेळी 'लिनेन' शर्टवर फोल्ड्स येतात आणि माझ्याबाबतीतही असेच घडले होतं, असं उत्तर त्यांनी दिलं होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अचानक मला पाहून शिंदे थबकले; संजय राऊत काय म्हणाले? दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक

Latest Maharashtra News Updates Live: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

हळदीकुंकवात करंडे- फण्या देऊन कंटाळलात? डीमार्टमध्ये १५ रुपयापासून मिळतायत भन्नाट ऑप्शन; वाचा यादी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रकल्पांना भूसंपादनाचे ग्रहण; शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन चिंतेत

SCROLL FOR NEXT