Raksha Bandhan esakal
देश

Video : मोदींना राखी बांधायला दिल्लीत येतेय मुस्लिम बहीण; कसं जुळलं अतूट नातं?

संतोष कानडे

Rakshabandhan 2023 : रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्याचा सण. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील रक्षाबंधनासाठी उत्सुक असतात. मूळची पाकिस्तानची असणारी त्यांची एक मुस्लिम बहीण यंदाही रक्षाबंधनासाठी दिल्लीत येत आहे.

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त सध्या बाजार फुलले आहे. नाना प्रकारच्या राख्यांनी मार्केट फुलून गेलंय. प्रत्येकाला राख्यांचं आकर्षण असतं. काही बहिणी आपल्या भावासाठी स्वतःच्या हाताने राख्या बनवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील त्यांची बहीण हाताने बनवलेली राखी बांधणार आहे.

येत्या ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण देशभरात साजरा होणार आहे. मूळच्या पाकिस्तानच्या असणाऱ्या कमर मोहसीन शेख या लग्नानंतर भारतात आल्या. त्याच पंतप्रधानांच्या मानलेल्या बहीण आहेत. मागच्या तीस वर्षांपासून त्या मोदींना राखी बांधतात. यावर्षीदेखील मोदींसाठी कमर शेख ह्या दिल्लीत येणार आहेत.

एएनआयशी बोलताना कमर मोहसीन शेख यांनी सांगितलं की, मी रक्षाबंधनानिमित्त पंतप्रधानांना शुभेच्छा देते. त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. देशासाठी मोदी उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

शिवाय पंतप्रधानांना शेतीविषयी आवड असल्याने एक पुस्तक त्या भेट देणार आहेत. मागच्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे आपण जावू शकलो नव्हतो. यावेळी मात्र दिल्लीला जावून पंतप्रधानांना राखी बांधणार असल्याचं शेख यांनी स्पष्ट केलं. मोदी मुख्यमंत्री होण्याच्या आगोदर, तीस वर्षांपासून कमर शेख ह्या त्यांना राखी बांधत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT