On Rally Day No NDA Leader At Patna Airport To Receive Soldiers Body
On Rally Day No NDA Leader At Patna Airport To Receive Soldiers Body 
देश

मोदींच्या रॅलीत अधिकारी व्यस्त; हुतात्मा जवानाच्या पार्थिवाकडे दुर्लक्ष!

सकाळन्यूजनेटवर्क

पटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आपल्या प्रत्येक रॅलीत, सभेत हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अपर्ण करीत दहशतवादाविरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. सोबतच देशाच्या वीर जवानांच्या बलिदानाचा बदला नक्की घेतला जाईल, अशा आशयाची वक्तव्ये केलीत. आजही पटन्यात आयोजित रॅलीत भारत आपल्या वीर जवांनांच्या बलिदानावर शांत बसणार नाही, असे वारंवार म्हणणाऱ्या मोदींच्या रॅलीमुळेच देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव आणण्यासाठी एकही सरकारी अधिकारी एअरपोर्टवर उपस्थित नव्हता!

जम्मू काश्मीर च्या कुपवाडा येथे हुतात्मा सीआरपीएफ पोलिस निरीक्षक पिंटू कुमार सिंह यांचे पार्थिव जेव्हा पटना एअरपोर्ट वर पोहोचले तेव्हा त्यांचे पार्थिव घेण्यासाठी कुणीही सरकारी अधिकारी तेथे उपस्थित नव्हते. सर्व अधिकारी हे पटना येथे सुरु असलेल्या एनडीएच्या संकल्प रॅलीत व्यस्त होते. 

हुतात्मा पिंटू कुमार सिंह हे बेगुसराय येथील रहिवासी होते. तेथेच त्यांच्यावर अंतीम विधी केले जातील. कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादींसोबत झालेल्या चकमकीत चार सुरक्षा रक्षक हुतात्मा झाले आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT