देश

"संपूर्ण जग आपलं कुटुंब! सर्व देशांतून यावं राममंदिरासाठी जल"

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अयोध्यामध्ये राम मंदिराच्या निर्मितीसाठी 115 देशांमधून पाणी आणण्यात आलं आहे. आज शनिवारी या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, राम लल्लाच्या जलाभिषेकासाठी सर्व देशांमधून जल आणलं पाहिजे. आपल्या ऋषींना संपूर्ण जगाला आपलं कुटुंब मानलं आहे. आपण जगाला 'वसुधैव कुटुम्बकम्'चा संदेश दिला आहे. यासाठी राम मंदिर निर्माण आणि जलाभिषेकासाठी जगातील सगळ्या देशांमधून जल आणलं पाहिजे.

अलिकेडच माध्यमांमध्ये अशी बातमी आली होती की, राम मंदिराच्या निर्मितीसाठी 115 देशांमधून जल आणलं जाईल. हे जल प्राप्त केल्यानंतरच संरक्षण मंत्र्यांचं हे महत्त्वपूर्ण विधान समोर आलं आहे. त्यांनी म्हटलंय की, हा एक अभिनव विचार आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही गौरवाची बाब आहे.

जाती-धर्माच्या आधारावर भारताची वाटणी नको

पुढे राजनाथ सिंह यांनी म्हटलंय की, भारत कधीच हिंसेचं समर्थन करत नाही. राम मंदिराची निर्मिती तेंव्हा सुरु झाली जेंव्हा सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय दिला. ही सकारात्मक सुरुवात आहे. भारताला कधीच जाती-धर्म अथवा समुदायाच्या आधारावर विभाजीत केलं जाऊ शकत नाही.

स्वयंसेवी संस्थेने केला होता दावा

अलिकडेच दिल्लीमधील एका स्वयंसेवी संस्थेने दावा केला होता की, त्यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी 115 देशांमधून जल मागवलं आहे. या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, अफगाणिस्तान, कॅनडा, कंबोडिया, जर्मनी, इटली यांसारख्या देशांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT