Pran Pratishtha Puja Sakal
देश

Ayodhya Pran Pratishtha: पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Pran Pratishtha Puja: अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते. (Ram Mandir Inaugurated by PM Narendra Modi Ayodhya ramlalla pran pratishtha puja vidhi in marathi)

गणेशपुजनानं या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी हा प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झाला. ८४ सेकंदाच्या अभिजात सुक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर दिग्गजांनी हजेरी लावली.

अनेक सेलिब्रेटिंची हजेरी

या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटिंनी देखील हजेरी लावली. यामध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, रजनीकांत, कंगना रणौत, अलिया भट, रणबीर कपूर, रामचरण, व्यंकटेश प्रसाद, रोहित शेट्टी, चिरंजीवी, माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने, कतरिना कैफ, विकी कौशल, आयुष्यमान खुराना, अनुपम खेर, राजकुमार हिरानी, मनोज जोशी यांसह इतरही अनेक सेलिब्रेटिंनी या सोहळ्याला हजेरी लावली.

उपस्थितांना दिली जाणार खास भेट

प्राण प्रतिष्ठेसाठी आयोजित निमंत्रितांना खास भेट दिली जाणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी खोदलेली माती आणि राम मंदिराची प्रतिमा याचा भेटीमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावेळी १५ फुटाची राम मंदिराची खास प्रतिमा भेट दिली जाणार आहे. (Marathi Tajya Batmya)

रामलल्या मुर्तीची काय आहेत वैशिष्ट्ये?

कर्नाटकातील अरुण योगीराज यांनी राम लल्लाची प्रतिमा साकारली आहे. रामलल्लाची मूर्ती दागिन्यांनी सजलेली आहे. डोक्यापासून पायापर्यंत अनेक दागिन्यांनी मूर्ती सजवण्यात आली आहे. त्याच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. कपाळाला सोन्याचा तिलक लावलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT