LK Advani will not go to Prana Pratishta ceremony 
देश

Ram Mandir Inauguration: अखेरच्या क्षणी लालकृष्ण अडवाणींनी घेतला सोहळ्याला न जाण्याचा निर्णय; काय आहे कारण?

LK Advani will not go to Prana Pratishta ceremony:अयोध्येमध्ये राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी मान्यवरांचे आगमन सुरु झालं आहे. यात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचं कळतंय.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अयोध्येमध्ये राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी मान्यवरांचे आगमन सुरु झालं आहे. यात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचं कळतंय. मीडिया रिपोर्टनुसार, अयोध्येमध्ये खूप थंडी आहे. त्यामुळे त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अडवाणी हे ९६ वर्षांचे आहेत. राम मंदिर आंदोलनात ते प्रमुख भूमिकेत होते. (Ram Mandir Inauguration bjp LK Advani will not go to Prana Pratishta ceremony)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील अयोध्येत येणार नाहीत. ते आपल्या कुटुंबासोबत बिर्ला मंदिरात राम सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहतील. सलग तीन तास ते कार्यक्रम पाहणार आहेत. त्यांच्यासोबत इतर भाजप नेते देखील असतील. देशभरात भाजपचे नेते राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह प्रक्षेपण पाहणार आहेत.

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना देण्यात आले होते. लालकृष्ण अडवाणी सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यांना अयोध्येत येण्यासाठी विशेष सुविधा करण्यात येईल अशी माहिती विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आली होती. मात्र, प्रकृतीचे कारण आणि अयोध्येमध्ये असलेली कडाक्याची थंडी पाहता त्यांनी सोहळ्याना न येण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना देखील अयोध्येचे निमंत्रण मिळालं होतं. पण, यातील कोणताच नेता आज अयोध्येत असणार नाही. एकटे जाण्यापेक्षा सर्व मंत्र्यांसोबत अध्योध्येला जाणार असल्याचं शिंदे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकच्या काळाराम मंदिरात जाण्याचं ठरवलंय, तर शरद पवार यांनी सोहळ्याला येणार नसल्याचं कळवलं आहे.

आज अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होईल. समस्त राम भक्तांना आजच्या दिवसांची प्रतिक्षा होती. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होईल. त्यानंतर राम मंदिर सर्वांसाठी खुले होईल. लाखोंच्या संख्येने भाविक दररोज राम मंदिराच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यादृष्टीने अयोध्येमध्ये तयारी केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT