Ram Lalla_Ram Mandir 
देश

Ram Mandir Latest Updates : अयोध्येतील कार्यशाळेतून रामलल्लाची मूर्ती मंदिराकडं रवाना; कडकोट सुरक्षा व्यवस्था

राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आता पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अयोध्या : राम मंदिराचा (Ram Mandir Latest News) उद्घाटन सोहळा आता पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी प्राणप्रतिष्ठा होणारी रामलल्लाची मूर्ती बनवून तयार झाली असून ती एका ट्रकमधून अयोध्येतील नियोजित राम मंदिराकडं रवाना झाली आहे. (Ayodhya Latest News)

अयोध्येतील मूर्ती कार्यशाळेत ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. कार्यशाळा ते राम मंदिर (Ram Mandir Latest Marathi News) हे अडीच ते तीन किमीचं अंतर आहे.

'जय श्रीराम'चा जयघोष

रामलल्लाची मूर्ती ट्रकमधून मंदिराच्या (Ram Mandir) दिशेनं मार्गस्थ होताच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी त्यांच्याकडून जय श्रीराम (Jay Shri Ram) असा जयघोष करण्यात आला. यावेळी अनेकांनी आपल्या आनंदाला पारावार उरला नसल्याची प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

सोहळ्याच्या तयारीनं घेतला वेग

अयोध्येतील राम जन्मभूमी (Ayodhya Ram Janmabhumi) इथं उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या अर्थात बाल रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार (Ram Mandir Innaugration) आहे. याला आता केवळ पाचच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते हा प्रमुख सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना तसेच रामभक्तांना निमंत्रण देण्यात आली आहेत. (Marathi Tajya Batmya)

पण या मुख्य सोहळ्यापूर्वी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पाडले जाणार (Ram Mandir Daily Marathi News) आहेत. यामध्ये गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती (Ram Lalla ) स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी विविध धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत. त्यानंतर २२ जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठेचा प्रमुख विधी पार पडणार आहे.

7000 हून अधिक लोकांना निमंत्रण

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टद्वारे तब्बल ७००० जणांना वैयक्तिकरित्या निमंत्रण पाठवली आहेत. यामध्ये राजकीय नेते, उद्योगपती, धार्मिक नेते आणि सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्याचबरोबर विविध देशांचे १०० प्रतिनिधी देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

गर्भगृहाचं काम पूर्ण

रामलल्लाची मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित होणार आहे त्या गर्भगृहाचं कामही नुकतंच पूर्ण झालं आहे. या गर्भगृहाला सोन्याचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. मैसूरस्थित मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT