देश

राम मंदिर घोटाळ्यावर राहुल गांधींची टीका; म्हणाले, रामाच्या नावावर...

विनायक होगाडे

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर तीर्थक्षेत्र विकास ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आणि जमिनीची किंमत २ कोटींवरून १८ कोटी २० लाखांपर्यंत वाढल्याचा आरोप झाल्यानंतर राजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे. विश्व हिंदू परिषदेने गैरप्रकाराचा आरोप फेटाळला असून भाजपने तर राम मंदिराच्या ऐतिहासिक आणि पवित्र कार्यात अडथळे आणण्याच्या कारस्थानाचा हा भाग असल्याचा आरोप केला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. (Ram Mandir Scam Rahul gandhi Attacked on Ram Mandir Ghotala)

राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणावर टीका करत म्हटलंय की, श्रीराम स्वत: न्याय आहेत, सत्य आहेत आणि धर्म आहेत. मात्र त्यांच्या नावावर दिलेला धोका हा अधर्म आहे. पुढे त्यांनी #राम_मंदिर_घोटाला असं म्हणत या साऱ्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे.

काय आहे हे प्रकरण?

अयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीवरून हा वाद उफाळला आहे. ही मुख्य मंदिराची जमीन नाही. मात्र येथे काही इतर मंदिरे उभी करण्याची परिषदेची योजना असल्याचे सांगितले जाते. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह तसेच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करताना त्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी किमतीची जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. तसेच कुसुम पाठक या महिलेकडून १८ मार्च २०२१ रोजी १८ कोटी २० लाख रुपयांना जमीन खरेदीच्या व्यवहाराची नोंद करणारे अयोध्येतील ‘बिल्डर’ सुलतान अन्सारी हे आज अयोध्येतील घरातून सहकुटुंब बाहेर निघून गेल्याने वेगळे वळण मिळाले. विश्व हिंदू परिषद या आरोपांची स्वतंत्र चौकशी करेल, असे सांगतानाच विहिंपचे महासचिव चंपत राय यांनी सारे आरोप राजकीय असल्याचे सांगून फेटाळले आहेत. भाजपने राम मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये अडथळे आणणाऱ्या विघ्नसंतोषी शक्तींकडून हे आरोप सुरू आहेत आणि ते निराधार आहेत, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकार याची चौकशी करेल, असे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले.

आमच्यावर तर गांधी यांच्या हत्येचाही आरोप

चंपत राय यांनी सांगितले, की आमच्यावर शंभर वर्षापासून आरोप होत आहेत. महात्मा गांधींच्या हत्येचाही आरोप आमच्यावर झाला. राजकीय आरोपांची चिंता आम्ही करत नाही, तुम्हीही करू नका. जे राजकीय लोक याबाबत प्रचार करत आहेत, तो भ्रामक आहे आणि समाजाची दिशाभूल करणारा आहे. संबंधित व्यक्तीही राजकीय आहेत. त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवावा असे नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT