Ayodhya Crowd 
देश

Ram Mandir Crowd: रामलल्लाच्या दर्शनासाठी दुसऱ्या दिवशीही तुफान गर्दी! थेट मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालक मैदानात

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामाचं दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाल्यानं देशभरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अयोध्या : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामाचं दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाल्यानं देशभरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्राण प्रतिष्ठेनंतर दुसऱ्या दिवशीपासून मंदिर सर्वसामान्य जनतेसाठी खुल करण्यात आलं.

पहिल्याच दिवशी लोकांची इतकी झुंबड उडाली होती की अक्षरशः चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आजही दुसऱ्या दिवशी पहाटे अंधारातच कडाक्याच्या थंडीत भाविकांनी तुफान गर्दी केली आहे. (Ram Mandir Stormy crowd on second day too for darshan of Ram Lalla Chief Secretary and DGP set for control)

गर्दीचा स्थिती पाहताना उत्तर प्रदेश पोलीस अ्न लष्कराच्या जवानांनाही पाचारण करण्यात आलं आहे. नियंत्रणासाठी खुद्द यूपीचे पोलीस महासंचालक मैदानात उतरले आहेत. लोकांनी रामपथावर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. (Latest Marathi News)

या स्थितीबाबत बोलताना उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रवीण कुमार म्हणाले, इथली गर्दी थांबायचं नाव घेत नाहीए, पण सुरक्षा विषयक तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांना विनंती करतो की त्यांनी दोन आठवड्यानंतर इथं दर्शनासाठी यावं.

त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे स्पेशल ADGLO प्रशांत कुमार म्हणाले, मोठ्या प्रमाणावर लोकांनी इथं गर्दी केली आहे. मुख्य सचिव आणि मला इथं पाठवण्यात आलं आहे. याठिकाणी गर्दीच्या नियंत्रणासाठी रागांची व्यवस्था आम्ही सुधरवली आहे. लोकांसाठी विशेष दर्शन मार्ग तयार केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT