Ram Navami 2023 information esakal
देश

Ram Navami 2023 : रावणाने लक्ष्मणाला दिले होते राजकारणाचे धडे! मोदी, शाह, पवारांनाही उपयुक्त टिप्स

रावणाने मृत्यू शय्येवर असताना लक्ष्मणाला उपदेश केला. तो आजच्या काळातही उपयुक्त आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ram Navami 2023 information: रावणाने सीता मातेला पळवून नेल्यानंतर श्रीराम आणि रावणाचं युद्ध झालं आणि त्यात श्रीरामांचा विजय झाला. ही रामायणाची कथा आपल्या सर्वांनाच माहित आहे.

पण ज्यावेळी रावण मृत्यू शैय्यवर होते, त्यावेळी रामाने लक्ष्मणाला त्यांच्याकडे पाठवून उपदेश घेण्यास सांगितला. रावण मोठे तपस्वी, हुशार आहेत. मोठे शिवभक्त आहेत, त्यांचा उपदेश भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरेल, असे सांगून लक्ष्मणाला पाठवले होते.

श्री रामांची आज्ञा म्हणून लक्ष्मण रावणाकडे गेलं. त्यांच्या पायाशी बसले. तुमच्या अंतिम क्षणी मला काही उपदेश करा म्हणून विनंती केली. त्यावेळा रावणाने लक्ष्मणाला ८ महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.

या गोष्टी राज्य कारभारासाठी तर उपयुक्त आहेतच. पण आजच्या काळातही लागू पडतात. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनीही जर या गोष्टी ध्यानात ठेवून वागले तर यशस्वी आणि समाधानी जीवन जगणे सहज शक्य होईल.

आजच्या राजकारण्यांनी तर या गोष्टी नक्कीच जाणून घेत अंमलात आणणे आवश्यक आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊया. (Latest Marathi News)

रावणाने लक्ष्मणाला राजकारणाविषयी केलेला उपदेश

  • तुमचा ड्रायव्हर, वॉचमन, कूक (स्वयंपाकी) आणि भाऊ यांच्याशी शत्रूत्व करू नका. ते कधीही तुमचे नुकसान करू शकतात.

  • तुम्हाला सतत यश मिळाले तरी तुम्हीच विजेते आहात असे समजू नका.

  • तुमच्यावर टिका करणाऱ्या निंदकांवर नेहमी विश्वास ठेवा.

  • तुमच्या शत्रूला कधी लहान, सामान्य किंवा शक्तीहीन समजू नका. जसं मी हनुमानाला समजलं होतं.

  • नशिबा पेक्षा जास्त कोणाला मिळत नसतं याचं भान असू द्या. तुमचे ग्रह तुम्ही बदलू शकत नाही.

  • देवावर प्रेम करा किंवा द्वेष करा. पण दोन्हीही अफाट आणि मजबूत असायला हवे.

  • वैभव मिळवण्यासाठी उत्सुक राजाने डोके वर काढताच लोभाचे शमन करायला हवं.

  • कोणत्याही राजाने इतरांचे भले करण्याच्या लहानशा संधीचही स्वागत करायला हवं. त्यासाठी जराही वेळ लावू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil: ''गौतमी पाटीलच्या जीवाला धोका..'' पोलिसांच्या नोटिशीला गौतमीचं उत्तर

Indian Railways Confirm Ticket : रेल्वेकडून प्रवाशांना लवकरच मिळणार Good News! आता ‘कन्फर्म’ तिकिटाची तारीख विनाशुल्क बदलता येणार

Latest Marathi News Live Update : बालकांच्या मृत्यूप्रकरणी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री नागपूरमध्ये दाखल

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ पुन्हा वादात अडकला; १८१ धावांच्या खेळीनंतर सर्फराज खानच्या भावाला बॅटने मारायला धावला... VIDEO VIRAL

गौतम गंभीरच्या राज्यात 'पराभव' हा पर्यायच असू शकत नाही, Varun Chakravarthy चे टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या शैलीवर मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT