Ram Rahim  
देश

Ram Rahim : तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आल्याचा आनंद! राम रहीमने तलवारीने कापला केक, गुन्हा दाखल होणार?

सकाळ डिजिटल टीम

Ram Rahim : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम सतत चर्चेत असतात. कोर्टातून ४० दिवसांचा पॅरोल मिळाल्यानंतर राम रहीम यांना गगनात मावेनासा आनंद झाला. राम रहीम शनिवारी बागपतमधील त्याच्या बर्नवा आश्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्याचा आनंद साजरा केला.

राम रहीम यांनी चक्क तलवारीने केक कापला. राम रहीम बलात्कार आणि हत्येप्रकरणी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

बलात्कार आणि हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेलेल राम रहीम यांना तिसऱ्यांदा पॅरोल मिळाल्याची चर्चा आहे. एका साध्वींचे लैंगिक शोषण आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी ते शिक्षा भोगत आहेत. दरम्यान त्यांना तिसऱ्यांदा पॅरोल मंजूर केल्याबद्दल लोक हरियाणा सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. 

राम रहीम यांच्या तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राम रहीम यांचे अनुयायी यावेळी उपस्थित होते. 

पॅरोलवर आल्यानंतर कोणत्याही शिक्षा झालेल्या कैद्याने शस्त्रास्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यास शस्त्र कायद्यानुसार बंदी आहे. असे असतानाही राम रहीमने तलवारीने केक कापला आहे. त्यामुळे राम रहीमवर गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT