Ayodhya Ram Mandir 
देश

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामाचे आगमन होताच 'लक्ष्मी' बरसणार, 50 हजार कोटींचा फायदा; कोणाच्या खिशात जाणार पैसा?

राम मंदिराचे उद्घाटनानंतर अयोध्या देशात पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होणार आहे. त्यामुळे याचा संपूर्ण देशाला फायदा होणार आहे. जानेवारीत हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ५० हजार कोटींहून अधिक कमाई होणार आहे.

Sandip Kapde

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत २२ जानेवारीला श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. सर्व तयारी शेवटच्या टप्प्यात आहेत. राम मंदिराचे उद्घाटनानंतर अयोध्या देशात पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होणार आहे. त्यामुळे याचा संपूर्ण देशाला फायदा होणार आहे. जानेवारीत हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ५० हजार कोटींहून अधिक कमाई होणार आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्या माहितीनुसार, देशातील सर्व बाजारपेठांमध्ये श्री राम ध्वज, श्री राम अंगवस्त्र, लॉकेट्स, चावी चेन, राम दरबाराच्या चित्रांसह श्रीरामाचे चित्र असलेल्या हारांचा मोठा साठा आहे. राम मंदिराच्या मॉडेलची चित्रे, सजावटीचे पेंडेंट आणि बांगड्यांसह अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यातही राम मंदिराच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणात मागणी असून हे मॉडेल हार्डबोर्ड, पाइनवुड, लाकूड इत्यादीपासून वेगवेगळ्या आकारात बनवले जात आहेत. (Ayodhya Ram Mandir)

हे मॉडेल बनवून मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार मिळत आहे. सर्व राज्यांमध्ये स्थानिक कारागीर, कलाकार आणि हातकाम करणाऱ्यांचाही मोठा व्यवसाय होत आहे. श्री राम मंदिराचा हा दिवस देशात व्यवसायासोबतच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे. मोठ्या प्रमाणात कुर्ते, टी-शर्ट आणि इतर कपडे देखील तयार केले जात आहेत.  विशेष म्हणजे कुर्ते बनवताना मुळात खादीचा वापर होतो.

22 जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पाहता मातीचे दिवे, रांगोळी काढण्यासाठी विविध रंग, फुलांच्या सजावटीसाठी फुले आणि बाजारपेठा आणि घरे उजळण्यासाठी विजेचे दिवे मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रस्त्यांवर लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर, पत्रक, इतर साहित्य, स्टिकर्स आदींसह प्रचार साहित्याचाही मोठा व्यापार होणार आहे, अशी माहिती प्रवीण खंडेलवाल यांनी दिली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT