Ramdas Athawale 
देश

मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना आठवल्यांनी दिला लग्नाचा सल्ला

राहुल गांधी खूप नाराज दिसतात आणि प्रत्येक वेळी त्यांना मोदींवर हल्ला करण्याची सवय आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : मोदी सरकारवर नेहमी टीका करणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लग्नाचा सल्ला दिला आहे. त्यांनी जर दलित मुलीबरोबर विवाह केला तर त्यांचे मन स्थिर होईल आणि ते विनाकारण टीका-टिप्पणी करणार नाहीत, असे आठवले म्हणाले. बुधवारी (ता.२७) भारतीय रिपब्लिक पक्षाच्या १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या रॅलीच्या तयारीनिमित्त लखनऊत ते आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एका प्रश्नाचे उत्तर देताना आठवले म्हणाले, की मी म्हटले होते की राहुल गांधी खूप नाराज दिसतात आणि प्रत्येक वेळी त्यांना मोदींवर हल्ला करण्याची सवय आहे. यामुळे माझे म्हणणे आहे की राहुल गांधींजींनी (Rahul Gandhi) भविष्यासाठी विवाह केला पाहिजे. काँग्रेस पक्षाचे तत्त्वज्ञान धर्मनिरपेक्ष आहे. जात निर्मूलन करायचे आहे. एकतर महात्मा गांधींनी जातीय व्यवस्था नष्ट करण्याचे आदेश दिले होते.

मात्र ७० वर्षांपासून काँग्रेस सत्तेत राहिली. मात्र जातीयवाद नष्ट करण्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष जातीय व्यवस्थेसाठी जबाबदार आहे, असे ते म्हणाले. आठवले म्हणाले, जर राहुल गांधींजींना जातीवाद नष्ट करायचा असेल, तर त्यांनी आंतरजातीय विवाह करावा. आठवले यांनी ब्राह्मण मुलीशी लग्न केल्याचे यावेळी सांगितले. राहुल गांधी दलित समाजातील मुलीशी लग्न का करित नाहीत, असा प्रश्न ते विचारतात. पक्षात दलितांसह इतर समाजाची लोकही आहेत, असे आठवले यांनी सांगितले. ब्राह्मण मतदारही पक्षाबरोबर जोडले जावे यासाठी प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले. महारॅलीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे महामंत्री सुनील बन्सलही सहभागी होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. युपी निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, की जर सर्वकाही व्यवस्थित राहिले तर भाजपकडे राज्यात ८ ते १० जागा मागवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT