देश

"अनिल देशमुखांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा"

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : गृहमंत्री अनिल देशमख यांनी राजीनामा दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करतानाच येत्या एक महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असे सूतोवाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेऊन सचिन वाझे यांनी दहशतवाद्यांसारखे कृत्य केले आहे. वाझे हे पूर्वी  शिवसेनेत होते. सेनेतील अनेक नेत्यांबरोबर घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिला पाहिजे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. हे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी यापूर्वीच आम्ही राष्ट्रपतींकडे केली आहे.

येत्या दोन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असे बोलले जाते,‌ यावर आठवले म्हणाले, " दोन महिने कशाला? एक महिनाभरात सरकार कोसळेल. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि आरपीआयबरोबर यावे, हा प्रस्ताव आधीच दिला होता. त्यांनी तातडीने निर्णय घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खाद्या लावून शरद पवार यांनी काम केले, तर देशाला त्याचा नक्कीच फायदा होईल. काँग्रेसने त्यांना योग्य वागणूक दिलेली नाही. त्यांनी एक मिनिटही त्या पक्षाबरोबर राहू नये."

"शरद पवार हे अभ्यासू नेते आहेत. परंतु ते काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर असल्याने त्यांचा उपयोग महाराष्ट्राला होत नाही. ते भाजप आणि आरपीआयबरोबर आल्यास देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. ते देखील हा निर्णय घेतील, अशी आशा आहे. त्यासाठी भाजप नेते पवार यांच्याशी चर्चा करतील. सध्या पवार आजारी आहेत, ते ठीक झाल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारला 'ठीक' करतील," असे सांगत आठवले यांनी नजीकच्या काळात महाराष्ट्रात सत्ताबदलाचे संकेत दिले आहे.

अनिल देशमुख यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांच्या खात्याचा एक पोलिस अधिकारी दहशतवाद्यासारखे कृत्य करतो. त्याची नैतिक जबाबदारी देशमुख यांनी स्वीकारायला हवी होती. नंतर शंभर कोटी वसुलीचा आरोप परमबीर सिंग या केला, त्यावेळी देखील त्यांनी राजीनामा दिला नाही. राष्ट्रवादी पक्षानेही त्यांना वाचविले. आता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देत या प्रकरणाचा न्यायनिवाडा केला आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

IPL 2026: विराट-धोनी आमने सामने येणार नाहीतच! MS Dhoni च्या खेळण्याबाबत नवी अपडेट समोर

Nagpur Bhosale Descendants : शिवरायांशी नागपूरच्या भोसले घराण्याचे नाते काय? नव्या पिढीचे वंशज आता काय करतात? पाहा वीरांचा वारस

Aniket Verma Inspirational Jounery : ३ वर्षांचा असताना आईचे निधन; वडिलांचे दुसरे लग्न... हार्दिक पांड्याची 'मॅगी' स्टोरी अन्...

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

SCROLL FOR NEXT