ramdas aathawale on rahun gandhi narendra modi esakal
देश

Narendra Modi : 'तुम्ही कितीही वाढवा दाढी.. लै मजबुत मोदींची बॉडी' अन् सभागृहात एकच हशा पिकला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्ताव चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. त्यांच्या भाषणातील मुद्द्यांचीच आज सर्वत्र चर्चा आहे. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शेरोशायरीने सभागृहात हशा पिकला होता.

राहुल गांधी यांनी काल सभागृहामध्ये अदानी प्रकरणावरुन मोदींवर निशाणा साधला होता. आज पंतप्रधानांनी शेरोशायरीतून त्यांनी उत्तर दिलं. मोदी म्हणाले की, मी काल पाहत होतो की काही लोकांच्या भाषणानंतर त्यांचे समर्थक उड्या मारत होते. कौतुक करत होते.

काही जण ये हुई ना बात असंही म्हणत होते. कदाचित त्यांना झोपही चांगली लागली असेल. कदाचित आज उठताही आले नसेल. अशा लोकांसाठी एक गोष्ट खुप चांगली. ती म्हणजे, 'ये कह कहकर हम दिल को बहला रहे हैं, वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे हैं। ' अशी शेरोशायरी करत मोदींनी राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोमणे मारले.

मात्र खरा हशा पिकला तो केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शेरोशायरीने. काँग्रेसवर बोलतांना आठवले म्हणाले की, 'राष्ट्रपती जी का भाषण मजबूत करेगा भारत नेशन, विरोध करना है कांग्रेस का फैशन.. इसलिए मैं उनके विरोध में कर रहा हूं भाषण'

'काँग्रेसवाल्यांनी जेवढी दाढी वाढवायची तेवढी वाढवावी'

'काँग्रेसवालो जितनी बढानी है बढाओ दाढी, लेकिन मोदी जी की बहुत मजबूत है बॉडी' काँग्रेसच्या लोकांनी कितीही दाढी वाढवली तरी मोदींची बॉडी मजबूत असल्याचं सांगून आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

आठवले पुढे म्हणाले की, मोदी जी को मालू है देश के तमाम लोगों की नाडी, तो काँग्रेस की कैसे चलेगी उनके सामना गाडी.. मोदी जी आदमी है खास, इसलिए उनके साथ है रामदास.. मोदी जी को विकास की है आस इसलिए राजनीति में वे हो गऐ हैं पास..असं म्हणून त्यांनी शायरी पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दिग्गज नेता भाजपात जाणार? सुजय विखेंचे खळबळजणक विधान

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Samruddhi Expressway fire incident : समृद्धी महामार्गावर इन्व्हर्टर बॅटऱ्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली

Loni Kalbhor crime case: प्रेमसंबंधातून महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करून बदनामी; आरोपी हिंगोलीतून अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT