देश

Ramdas Athawale:"नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार ? NDA मध्ये करणार कमबॅक' रामदास आठवलेंचा मोठा दावा

Athawale in Bihar: केंद्रीय मंत्री रामदास आठवले सध्या बिहारमध्ये आहेत. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांना विरोधकांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आणि ते एनडीएमध्ये परत येऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवली.

सकाळ डिजिटल टीम

Ramdas Athwale on Nitish Kumar:केंद्रीय मंत्री रामदास आठवले शनिवारी (दि.२९ जुलै)बिहार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दावा केला की नितीश कुमार केव्हाही आमच्याकडे परत येऊ शकतात. तसेच त्यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीवर वक्तव्य केलंय की नितीश कुमार यांनी या बैठकीपासून लांब राहिलं पाहिजे. यावेळी ते विरोधकांच्या INDIA युतीबद्दल म्हणाले की विरोधकांनी एकत्र येणे हा त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.२८ जुलै)बिहार दौऱ्यावर असताना नितीश कुमार यांच्याबद्दल मोठा दावा केला. ते म्हणाले की नितीश कुमार आमचे आहेत. ते आमच्याजवळ कधीही येऊ शकतात.

जेव्हा आठवलेंना विचारण्यात आलं की ते नितीश कुमार यांना भेटणार आहेत का, यावर आठवले म्हणाले की ते यावेळी कुमारांची भेट घेण शक्य नाही. तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते खुल्या मंचावर म्हणाले आहेत की, ते नितीश कुमार यांचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन घेणार नाही.

यावेळी त्यांनी विरोधकांच्या युतीवर भाष्य केलंय. ते म्हणाले की, जी युती त्यांनी बनवली आहे, त्याचं नाव इंडिया ठेवलंय. एक काळ होता जेव्हा 'इंडिया इज इंदिरा'असं म्हटलं जायचं. पुढे ते म्हणाले की आमची युती एनडीए आहे. विरोधक आमच्या विरोधात एकत्र येत आहेत, जो त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मात्र, लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अग्रस्थानी आहेत.

आम्ही नितीश कुमार यांचा आदर करतो

रामदास आठवले नितीश कुमार यांच्याबद्दल म्हणाले की,"आम्हाला त्यांची अनुपस्थिती जाणवतं आहे. त्यांनी विरोधकांच्या बैठकांपासून लांब राहिलं पाहिजे. जेव्हा ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री होते, तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. आम्ही सर्व त्यांचा आदर करतो."

यापुढे ते म्हणाले की,"जर त्यांना आरजेडीमध्ये जायचं होतं, तर ते एनडीएमध्ये परत का आले. बिहारची जनता आमची जनता आहे. नितीश आमचे सर्वांचे मित्र आहेत. जेव्हा विधानसभेत त्यांच्या पक्षाचे फक्त ४४ आमदार होते, तेव्हा आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवलं होतं."

यावेळी त्यांनी अजित पवारांचा देखील उल्लेख केला. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हातमिळणी केली यावर आठवले म्हणाले की जे लोक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये टिकले आहेत, त्यांना दोषी ठरवण्यात येतं, ना की त्या लोकांना जे एनडीएमध्ये सामील झाले. जे लोक स्वच्छ असतात, ते आमच्याकडे येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT