ramdas athawale on why he wear colorful suits Ramdas Athawale said that he would like to work in films  
देश

Ramdas Athawale Clothes : आठवले अतरंगी कपडे का घालतात? स्वतःचं सांगितलं कारण, म्हणाले…

रोहित कणसे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - आठवले पक्षाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे राजकारणासोबतच त्यांच्या कविता आणि रंगीबेरंगी कपडे यांच्यासाठी ओळखले जातात . यावरून आठवले नहमी चर्चेत देखील असतात. टिपीकल नेते मंडळी घालतात तशा कपड्यांमध्ये आठवले कमीच दिसतात. पण नेमकं आठवले रंगीत सूट का घालतात या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं आहे.

रामदास आठवले नेहमीच कलरफूल सूट-बुटात दिसून येतात. त्यांनी नुकतेच जनसत्ता या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण सांगितलं आहे.

आठवले यांनी सांगितलं की, मी ट्रॅडिशनल नेता नाहीये. मला पहिल्यापासूनच वेगवेगळ्या वेषभूषा करण्याची सवय आहे. मी कलरफुल कपडे घालते. जेव्हा मी सोमनाथ चॅटर्जी यांच्या सोबत त्रिनिदाद आणि टोबैगो येथे गेलो होतो, तेव्हा माझी ओळख करून देताना ते म्हणत की हे आमच्या संसदेतील सर्वात कलरफुल खासदार आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आठवले यांनी पुढे बोलताना सांगितले की, ते स्वःचे कपडे स्वतःच खरेदी करतात. ते म्हणले की, माझे सर्व कपडे वेगळे असतात. मी कुर्ता पायजामा जास्त वेळा घालत नाही. मी सहसा कपडे मुंबई येथून घेतो दिल्लीमधून देखील कधी-कधी घेतो. आठवले यांनी सांगितलं की त्यांचा आवडता ब्रँड असा नाहीये पण त्यांना वेगवेगळे कपडे घालण्याचा छंद आहे.

आठवलेंना चित्रपटांमध्ये काम करायचंय

रामदास आठवले यांनी या मुलखतीत त्यांना चित्रपट पाहायला आवडते असेही सांगितलं. हिंदी चित्रपट सृष्टीतील आवडते कलाकार अमिताभ बच्चन, तर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या राय बच्चन फेवरेट असल्याचे आठवले म्हणाले. तसेच ते स्वतः देखील चित्रपटात काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील रामदास आठवले यांनी काही मराठी चित्रपटात काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT