Rahul Gandhi Sanjay Raut Sakal
देश

Ramdas Athawale : "संजय राऊतांनी आणखी २०-२५ वर्षे विरोधी पक्षात राहावं"

संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते, तिथे त्यांनी राहुल गांधींची गळाभेटही घेतली.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जो़डो यात्रेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत काल सहभागी झाले होते. त्यावरुनच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना टोला लगावला आहे.

रामदास आठवले उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी संजय राऊत आमच्या यात्रेत सहभागी होत नाही, ते भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे त्यांनी आणखी २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं, असा टोला आठवलेंनी लगावला आहे.

खासदार संजय राऊत काल जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींची गळाभेटही घेतली. या यात्रेदरम्यानचे फोटो संजय राऊतांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन शेअर केले आहेत. त्यावर माध्यमांनी रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

संजय राऊत - राहुल गांधी भेटीमध्ये काय झालं?

राहुल गांधींसोबतच्या भेटीमध्ये काय झालं याबद्दल संजय राऊतांनी सांगितलं आहे. राहुल गांधींनी आपल्याकडे उद्धव ठाकरेंची चौकशी केल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय डरो मत हा त्यांचा आणि माझा सामायिक मंत्र आहे. माझ्या घरातल्यांचीही चौकशी राहुल गांधींनी केल्याचं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025 : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप ! दुसऱ्या दिवशीही राज्यासह देशभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

Sunday Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात कमी वेळेत बनवा बटाटा अन् रव्यापासून स्वादिष्ट पुरी, लगेच नोट करा रेसिपी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : पुण्यात २२ तासांनंतरही गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह

आजचे राशिभविष्य - 7 सप्टेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT