ravi kishan shukla 
देश

रमेश बिधुरी प्रकरण! दानिश अलींच्या वर्तनाची चौकशी करण्याची आणखी एका भाजप खासदाराची मागणी

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : MP Abuse In Parliament:संसदेत चांद्रयान-३च्या विषयावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे असभ्य शब्द वापरले होते. यावरून विरोधक आक्रमक झाले असताना भाजप खासदारांकडून दानिश अली यांचीच चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निशिकांत दुबे यांच्यानंतर भाजपचे आणखी एक खासदार रवी किशन शुक्ला यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बसपा खासदार दानिश अली यांच्या वर्तनाची चौकशी करण्याची विनंती केली. शुक्ला यांनी अली यांच्यावर 'असंसदीय' कृत्ये केल्याचा आणि सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप केला आहे.

भाजप नेते रमेश बिधुरी यांनी गुरुवारी सभागृहात अली यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल विरोधी पक्षांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर दुबे यांनी आरोप केला आहे की बसपा खासदाराने सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला चिथावणी देण्याच्या हेतूने अशोभनीय टिप्पणी केली होती. अली यांनी रविवारी दुबे यांच्या आरोपांना "निराधार" म्हटलं.

लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात शुक्ला म्हणाले की, बिधुरी यांनी अली यांच्या विरोधात वापरलेले शब्द 'मान्य नाहीत', पण ज्या परिस्थितीत एका खासदाराने सभागृहात दुसऱ्या खासदाराविरुद्ध असे आक्षेपार्ह शब्द वापरले 'त्यांचीही चौकशी करण्याची गरज आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

Uttarakhand: युवक आता फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर रोजगारनिर्माते; क्रीडा विद्यापीठापासून स्टार्टअपपर्यंत धामींच्या योजना

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

SCROLL FOR NEXT