देश

माजी मंत्री देणार आमदारकीचा राजीनामा?

सध्या ते मुंबईत असून तिथून थेट बंगळूरला जाऊन राजीनामा देणार ?

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी (ramesh jarkiholi) आमदारपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सध्या ते मुंबईत (mumbai) असून तिथून थेट बंगळूरला (bengaluru) जाऊन राजीनामा देणार असल्याचे त्यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितल्याचे समजते.

सीडी प्रकरणाला पाच महिने झाले तरी भाजप (BJP) नेते यातून त्यांना वाचविण्यास उत्सुक नाहीत. प्रकरणाचा गुंता वाढविण्यात येत असल्याचे दुःखही त्यांनी बोलून दाखविल्याचे समजते. राज्यात आमच्या पक्षाचे व मी सत्तेत आणलेले सरकार असतानाही पाठिंबा मिळत नाही. मंत्रीपदाचा राजीनामा देताना प्रकरणातून लवकर बाहेर काढून पुन्हा मंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, आता बी रिपोर्ट घालून मंत्रीपद देण्याची इच्छा दाखविली जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली आहे.

तसेच एच. विश्वनाथ यांनी काढलेल्या जलसिंचन योजनेतील २० हजार कोटी रुपयांच्या निविदा प्रकरणावरुनही ते नाराज असल्याचे समजते. ते पुन्हा मंत्रिपदावर येण्यापूर्वी २०,००० कोटींचा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली आहे. ही रक्कम खर्च होईपर्यंत आपणास मंत्रिपदापासून दूर ठेवण्याचा कट आखण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात भाजपचे काही नेते कट रचत असल्याने ते संतप्त असल्याचे समजते. पण, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जारकिहोळी यांच्यासह त्यांचे भाऊ व केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी, आमदार महेश कुमठळ्ळीही मुंबईला गेल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT