ramlela sakal
देश

दिल्लीतील एम्स संस्थेत विद्यार्थ्यांनी सादर केलेली रामलीला वादाच्या भोवऱ्यात

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेत विद्यार्थ्यांनी सादर केलेली रामलीला वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण करताना असभ्य कृत्य केल्याचा आणि रामायणातील पात्रांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार केली जात असून जात असताना, त्यांच्या अटकेची मागणीही जोर धरू लागली आहे.

एम्सच्या काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रामलीला सादरीकरणाच्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक जणांनी हा व्हिडिओ ट्विट करीत त्यावर हिंदू देवतांचा अपमान केला जात असल्याची टीका केली आहे. त्यावर, एम्स विद्यार्थी संघटनेने रविवारी एका ट्विटद्वारे निवेदन जारी केले आहे की, विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही या सादरीकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्याचा हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. भविष्यात असा कोणताही उपक्रम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.

हिंदू विचारांच्या‌ संघटनांसह अन्य राजकीय पक्षांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. कोणत्याही देवतांची अशा प्रकारे बदनामी योग्य‌ नसल्याचे मत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले आहे. भाजपच्या आधात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी या प्रकाराचा निषेध करीत या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.

"एम्स दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या रामायणाच्या विडंबनाचा आम्ही तीव्र निषेध करतो. सध्याच्या काळात देशाची तरुण पिढी आपली संस्कृती आणि सभ्यता विसरत चालली आहे. त्यांनी चुकीच्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे. अशा विद्यार्थ्यांना सुबुद्धी मिळो."

- लोकेश चुग (राष्ट्रीय सचिव, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st T20I: इशान किशनचं पुनरागमन होणारच, पण मग संजू सॅमसनचं स्थान धोक्यात? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्टच सांगितलं...

मावस बहिणीच्या दिरासोबत रिलेशनशिपमध्ये होती अनुश्री माने; लग्नही ठरलेलं... पण ब्रेकअपची झालेली जोरदार चर्चा कारण

Latest Marathi News Live Update : २३ जानेवारी रोजी पुणे शहरातील शाळांना सुट्टी

Dhule Municipal Election : धुळ्यात भाजपचा 'मास्टरस्ट्रोक' यशस्वी! ३१ प्रस्थापितांना डच्चू देऊनही सत्तेचा मार्ग मोकळा

एकेकाळी पुण्यातील छोट्याशा चष्म्याच्या दुकानात नोकरी करायची 'ही' अभिनेत्री ; आता बॉलिवूडमध्येही कमावलंय नाव

SCROLL FOR NEXT