Ramoji Rao  sakal
देश

Ramoji Rao : ईनाडू माध्यम समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे निधन

ईनाडू माध्यम समूहाचे संस्थापक-अध्यक्ष रामोजी राव (वय ८७) यांचे हैदराबादमधील स्टार हॉस्पिटल येथे शनिवारी पहाटे निधन झाले.

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : ईनाडू माध्यम समूहाचे संस्थापक-अध्यक्ष रामोजी राव (वय ८७) यांचे हैदराबादमधील स्टार हॉस्पिटल येथे शनिवारी पहाटे निधन झाले. प्रकृतिअस्वास्‍थ्यामुळे ते मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते, अशी माहिती ई-टीव्ही तेलंगणाच्या माध्यमातून दिली. त्यांचे पार्थिव रामोजी फिल्मसिटी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे.

जगातील सर्वांत मोठ्या फिल्मसिटींपैकी एक असणाऱ्या रामोजी फिल्मसिटीची निर्मितीदेखील राव यांनीच केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी देशभरात प्रसिद्ध असलेल्या ई-टीव्ही नेटवर्कची सुरुवात केली. विविध भाषांत चित्रपटनिर्मिती करणाऱ्या ‘उषाकिरण मुव्हीज’ची स्थापनाही राव यांनी केली. मयूरी फिल्मडिस्ट्रिब्युटर, मार्गदर्सी चीट फंड आणि डॉल्फिन हॉटेल्स यांसारख्या विविध क्षेत्रांत सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांची त्यांनी सुरुवात केली.

राव यांनी केलेल्या कार्यासाठी २०१६मध्ये त्यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी यांसह विविध राजकीय नेत्यांनी तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

रामोजी राव यांनी पत्रकारिता, राजकारण आणि चित्रपट क्षेत्रात इतिहास घडविला. ते माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि माझे मार्गदर्शक होते.

- रजनीकांत, अभिनेता

रामोजी राव हे द्रष्टे होते, त्यांनी भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवून आणली. त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आणि माध्यम जगतात अथक परिश्रम घेत नावीन्यता आणि उत्कृष्ट कार्यशैली यांची नवी मानके स्थापन केली.

- नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते

रामोजी राव यांच्या निधनाने देशाच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेत त्यांनी देशात अनेक व्यवसायांची स्थापना केली. त्यांचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील.

- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT