164 crore recovery notice to Arvind Kejriwal political advertisements aap govt politics Team eSakal
देश

Delhi Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यावर केजरीवालांची थेट कारवाई

या भयानक प्रकारामुळं दिल्लीसह देशभरात खळबळ उडाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दिल्ली सरकारमधील अधिकाऱ्याविरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच मुख्य सचिवांकडून या घटनेचा सविस्तर अहवाल आजच संध्याकाळपर्यंत मागवला आहे. (Rape accused Delhi govt officer has been suspended with immediate effect by CM Arvind Kejriwal)

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची आणि यातून ती गर्भवती राहिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. १ ऑक्टोबर २०२० रोजी वडिलांचं निधन झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी आरोपी अधिकाऱ्या घरी त्याच्या कुटुंबासमवेत राहत होती. विशेष म्हणजे या मुलीचे वडील आरोपी अधिकाऱ्याचे मित्र होते.

पीडित मुलगी घरी रहायला आल्यानंतर अनेकदा या अधिकाऱ्यानं तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा आरोपी अधिकाऱ्याच्या पत्नीनं या पीडितेला गर्भापाताच्या गोळ्या खायला दिल्या. पण हा प्रकारे तेव्हा उघड झाला जेव्हा नैराश्येचा अटॅक आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा डॉक्टरांशी तिनं या गोष्टी शेअर केल्या. दिल्ली पोलिसांनी अधिकाऱ्यांविरोधात IPC आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, आरोपी अधिकाऱ्यानं मुलगी गर्भवती राहिल्याचं आपल्या पत्नीला सांगितलं त्यानंतर त्याच्या पत्नीनं आपल्या मुलाकरवी गर्भपाताच्या गोळ्या मागवल्या आणि पीडितेला खायला दिल्या. त्यामुळं आरोपी अधिकाऱ्याला मदत केल्याच्या आरोपाखाली सहआरोपी असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

केजरीवालांनी काय म्हटलंय?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिला व बाल विकास मंत्रालयातील या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिल्ली सरकारचे मुख्य सचिव नरेश कुमार यांना संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपीवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली होती.

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी अधिकाऱ्याला अटक का झाली नाही यावर नाराजी व्यक्त करत नोटीस पाठवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT