Rape Survivor Can Also Get Punishment If He Or She Turning Hostile To Protect The Accused 
देश

...तर बलात्कार पीडितेवरही खटला : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ''बलात्कारप्रकरणात पीडित महिलेकडून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला गेल्यास आणि त्यासाठी जबाब बदलल्यास संबंधित व्यक्तीवरही खटला चालवण्यात येणार आहे'', असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. 

याबाबतचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. यामध्ये सांगण्यात आले, की आरोपीविरोधात आवश्यक पुरावे असूनही पीडित व्यक्ती आपला जबाब बदलून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दिसल्यास त्यानुसार ही कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी अशाप्रकरणात आरोपीकडून तडजोडीचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे. एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून यावर मत नोंदविण्यात आले आहे.  

दरम्यान, ''गुन्ह्यातील सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी जबाब नोंदविला जातो. गुन्ह्याची चौकशी कशी व्हावी, हे त्या-त्या प्रकरणावरील तथ्यांवर अवलंबून असते. आरोपी किंवा पीडित व्यक्ती यांपैकी कोणालाही हक्क नाही की त्यांनी आपला जबाब पलटवावा'', अशा शब्दांत न्यायालयाने खडसावले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : नागपूरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT