Indian Constitution 
देश

Constitution Edition Auction: संविधानाच्या दुर्मिळ पहिल्या प्रतीचा झाला लिलाव; तब्बल 'इतक्या' रक्कमेची लागली बोली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानाची पहिली प्रत जी कलेचा एक अप्रतिम नमुना मानली जाते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानाची पहिली प्रत जी कलेचा एक अप्रतिम नमुना मानली जाते. या पहिल्या प्रतीचा लिलाव झाला असून ही प्रत तब्बल ४८ लाख रुपयांना विकली गेली आहे. आजवर या प्रतीची लावलेली ही सर्वाधिक बोली आहे. 'सॅफ्रन आर्ट' या प्राचीन वस्तू, पुस्तकांचे लिलाव करणाऱ्या कंपनीनं ही बोली लावली होती.

डेहराडूनच्या भारतीय सर्वेक्षण कार्यालयाकडून या पहिल्या प्रतिच्या केवळ १,००० प्रती छापण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारनं सन १९५० मध्ये संविधानाची ही प्रत्र प्रकाशित केली होती. या प्रतीमध्ये संविधान लिहिणाऱ्यांची स्वाक्षरी देखील आहे. ही फोटोलिथिग्राफिक प्रत ज्याची ब्ल्यू प्रिंट भारताच्या संसदेतील लायब्ररीमध्ये ठेवण्यात आली आहे.

तीन दिवस चालला ऑनलाईन लिलाव

२४ ते २६ जुलै या तीन दिवसांच्या काळात हा ऑनलाईन लिलाव सुरु होता. यामध्ये भारतीय इतिहास, कला, साहित्य आणि प्राचीन वस्तूंचा समावेश होता. हा लिलाव कार्यक्रम घडवून आणणाऱ्या 'सॅफ्रन आर्ट' कंपनीच्या सहसंस्थापक मीनल वजीरानी यांनी सांगितलं की, आपल्या सौंदर्यशास्त्राशिवाय प्रत्येक वस्तूला भारताच्या परंपरेचा दस्ताऐवज म्हणून ऐतिहासिक मूल्य असते.

डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या संविधनाच्या ब्ल्यू प्रिंटवर सन १९४६ च्या संविधान सभेत २८४ सदस्यांच्या हातांचे निशान आहेत. यामध्ये लेखिका कमला चौधरी यांची हिंदीतील तर तत्कालीन प्रधान मंत्री जवाहरलाल नेहरु यांच्या इंग्रजीतील स्वाक्षरीचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT