RSS esakal
देश

'देर आये दुरुस्त आये'; RSS ने डीपी बदलल्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंगा राष्ट्रध्वज मानत नाही, अशी टीका नेटकऱ्यांकडून सातत्याने होत होती.

सकाळ डिजिटल टीम

'हर घर तिरंगा' अभियानाला आजपासून सुरूवात होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोदी सरकारकडून हे अभियान राबवलं जात आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यानिमित्त देशवासियांना आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंग्याचा डीपी लावण्याचं आवाहन केलं आहे. (Har Ghar Tiranga Abhiyan)

'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत घराघरावर तिरंगा लावण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी या मोहिमेचं स्वागत केलं असून काही जणांनी या मोहिमेवर टीकाही केली आहे. दरम्यान, या मोहिमेची घोषणा झाल्यापासूनच अनेक जण एकच प्रश्न विचारत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंग्याचा फोटो डीपीला कधी ठेवणार?

अखेर या प्रश्नाचं उत्तर नेटकऱ्यांना मिळालं आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सला आता तिरंग्याचा फोटो लावलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंग्याचा स्विकार करत नाही, तिरंगा मानत नाही, अशी टीका हर घर तिरंगा अभियानाच्या घोषणेनंतर होत होती. मात्र आता RSS च्या या कृतीमुळे संघाने तिरंगा स्विकारला आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT