Bihar Hajipur Video Viral esakal
देश

Bihar : साधूच्या वेशात भिक्षा मागणाऱ्या मुस्लिम तरुणांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण

मुस्लिम तरुण साधूच्या वेशात भिक्षा मागत होते.

सकाळ डिजिटल टीम

मुस्लिम तरुण साधूच्या वेशात भिक्षा मागत होते.

बिहारच्या हाजीपूरमधील (Bihar Hajipur) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते 6 जणांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. ज्या सहा जणांना मारहाण करण्यात आलीय, ते मुस्लिम तरुण (Muslim Youth) असून साधूच्या वेशात भिक्षा मागत होते. हाजीपूरमधील कदमघाट इथं हे लोक साधूच्या वेशात नंदी बैलासोबत थांबले असते, त्यांना मारहाण करण्यात आलीय.

राष्ट्रीय बजरंग दलाच्या (Rashtriya Bajrang Dal) कार्यकर्त्यांना संशय आल्यानं त्यांनी तरुणांकडं चौकशी सुरू केली. चौकशीत साधूच्या वेशात आलेले लोक मुस्लिम असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर बजरंग दलाच्या लोकांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणांना पोलीस ठाण्यात नेलं. पोलीस चौकशीदरम्यान तरुणांनी हा आमचा पिढीजात धंदा असल्याचं सांगितलं. आमचे पूर्वजही नंदीबैल घेऊन गावागावात, घरोघर जाऊन भीक मागायचे आणि परंपरेनुसार आम्हीही तेच काम करतो, असं तरुणांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी पीआर बॉन्ड लिहून घेत त्यांना सोडलं. तसंच नंदीबैलाला गोशाळेत पाठवण्यात आलंय.

Muslim Youth

हाजीपुरात नेमकं काय घडलं?

हाजीपूर इथं काही साधू नंदीबैल घेऊन आल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. साधूंची चौकशी केली असता, ते मुस्लिम असल्याचं समोर आलं. यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. लाठ्या-काठ्यांनी त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सहा मुस्लिम तरुण आणि सहा नंदीबैलांची सोडवणूक केली. तसंच त्यांच्याकडून पीआर बॉन्ड लिहून घेत त्यांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय. सध्या मारहाणीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT