RSS
RSS esakal
देश

Fact Check: RSS ने ५२ वर्षे तिरंगा न फडकवण्याचं कारण देशाचा Flag Code?

सकाळ डिजिटल टीम

देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनानंतर पहिल्यांदाच नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या कार्यालयात २६ जानेवारी २००२ रोजी तिरंगा फडकला. त्याआधी, २००१ मध्ये राष्ट्रप्रेमी युवा दलाच्या तीन कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने संघ मुख्यालयावर तिरंगा फडकावला होता.

RSS ने 52 वर्षे राष्ट्रध्वज का फडकावला नाही असे विचारले असता, समर्थकांकडे स्पष्टीकरण तयार आहे. त्यांचा असा दावा आहे की RSS ने राष्ट्रध्वज फडकावला नाही कारण २००२ पर्यंत तत्कालीन केंद्र सरकारने सुधारित ध्वज संहिता जाहीर केल्यापर्यंत सामान्य नागरिकांना राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी नव्हती.

संघ समर्थकांकडून नॅशनल फ्लॅग कोडचे कारण दिले जात असले तरी विरोधक मात्र यावरून देखील टीका करतात. altन्यूज या वेब साईटने केलेल्या फॅक्ट चेक नुसार नॅशनल फ्लॅग कोडमध्ये खाजगी संस्थांना राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी नव्हती मात्र स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि गांधी जयंती या तीन राष्ट्रीय सणांच्या वेळी मात्र तिरंगा फडकवला जाऊ शकत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या तीन दिवशी देखील कधी तिरंगा फडकवला नाही. यातून त्यांचा हेतु व वर दिलेले कारण योग्य नाही असा आरोप संघाच्या विरोधकांकडून केला जातो.

Alt न्यूजने याबद्दलचे काही पुरावेही सादर केले आहेत. त्यांनी पंजाब सरकारच्या वेबसाईटचा हवाला देत त्यांनी काही कागदपत्रंही सादर केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT