Ratan Tata_PM Modi
Ratan Tata_PM Modi 
देश

PM CARES Fund : रतन टाटा पीएम केअर्स फंडाचे नवे ट्रस्टी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचा आता पीएम केअर्स फंडाच्या ट्रस्टींमध्ये समावेश झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून निवदेनाद्वारे याची घोषणा केली आहे. फंडाच्या नव्या ट्रस्टींमध्ये रतन टाटा यांच्यासह सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस, माजी लोकसभा उपाध्यक्ष करिया मुंडा या मान्यवारांचा समावेश आहे. (Ratan Tata among newly appointed trustees of PM CARES Fund)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पीएम केअर्स फंडाच्या विश्वस्त मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीला आधीचे ट्रस्टी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही उपस्थिती लावली होती. या बैठकीच्या एका दिवसानंतर नव्या ट्रस्टींची घोषणा करण्यात आली आहे. पीएमओनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पीएम केअर्स फंडाच्या ट्रस्टींचं स्वागत केलं आहे.

तसेच या बैठकीत पीएम केअर फंडाच्या मदतीनं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर सादरीकरण करण्यात आलं, या बैठकीला रतन टाटाही उपस्थित होते. नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागामुळे पीएम केअर फंडाच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळेल, असं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं.

ट्रस्टने पीएम केअर्स फंडासाठी सल्लागार मंडळाच्या स्थापनेसाठी पुढील प्रतिष्ठित व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक राजीव महर्षी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती त्याचबरोबर टीच फॉर इंडियाचे सह-संस्थापक, इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे माजी सीईओ आनंद शाह यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील मतदार 'विनाश'ला नव्हे तर 'विकास'ला मत देण्याइतपत हुशार आहेत; राऊतांना भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT