Ratan Tata esakal
देश

रतन टाटांचा श्नान फारच छान; मीटिंगमधील किस्सा होतोय व्हायरल

किस्सा ऐकून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन

सकाळ डिजिटल टीम

या भेटीनंतर त्यांनी रतन टाटांची भरभरून स्तुती करताना या मुलाखतीवेळी घडलेला रतन टाटांचा एक खास किस्सा सांगितला आहे.

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना कोण ओळखत नाही. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील आपल्या योगदानामुळे रतन टाटांचा फक्त भारतात नाही तर जगभरात आदर केला जातो. रतन टाटा त्यांना भेटण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. परंतु त्यांना भेटणं इतके सोपं नाही. परंतु करिश्मा मेहता नावाच्या एक तरूणी रतन टाटांची मुलाखत (Interview) घेण्याची संधी मिळाली. या भेटीनंतर त्यांनी रतन टाटांची भरभरून स्तुती करताना या मुलाखतीवेळी घडलेला रतन टाटांचा एक खास किस्सा सांगितला आहे.

करिश्मा मेहता (Karishma Mehta) या ह्यूमंस ऑफ बॉम्बे (Humans of Bombay) या संस्थेच्या संस्थापक आणि सीईओ असून त्या रतन टाटा यांना भेटण्यासाठी रतन टाटांच्या ऑफिसबाहेर वाट बघत बसल्या होत्या, परंतु त्याचवेळी तिची नजर तेथील श्वानावर गेली. रतन टाटांच्या शेजारच्या खुर्चीत तो आरामात बसला होता. रतन टाटा यांची मुलाखत घेण्यासाठी तिने खूप वाट पाहिली होती आणि आता संधी मिळाली तर या पुढे या श्वान बसलेला. त्याला पाहून ती प्रचंड घाबरून गेली होती.

करिश्माने ही गोष्ट रतन टाटांचे सहाय्यक शंतनू यांना सांगितली. "मला श्वानाची खूप भिती वाटते", असं त्यांनी शंतनू यांना सांगितले. परंतु रतन टाटांनी त्यांचं बोलणं ऐकलं आणि त्यांनी करिश्मांना विचारले, 'काय झाल? तुम्ही ठीक आहात ना?' त्यावर करिश्मा यांना श्वानाची भीती वाटते असं शंतनू यांनी रतनजींना सांगितले.

त्यावर रतन टाटांनी स्मित हास्य केलं आणि त्या खुर्चीतील श्वानाकडे वळून त्याला ते म्हटले, "गोवा (रतन टाटांच्या श्वानाचे नाव), त्या तुला घाबरत आहेत. प्लीज एखाद्या चांगल्या मुलासारखं शांत बस!' त्यानंतर सुमारे 30-40 मिनिटे त्यांनी रतन टाटांशी संवाद साधला. विशेष म्हणजे परंतु गोवा त्यांच्या जवळ अजिबात आला नाही. हे सगळा प्रकार पाहून त्या चकीत झाल्या. असं तिच्यासोबत यापूर्वी कधीच घडलं नव्हतं! त्यांनी ही घटना Linkdine वर शेअर केली आहे.

गोवा हा रतन टाटांचा अतिशय प्रिय कुत्रा आहे. तो त्यांच्यासोबत कायम असतो. बऱ्याचदा ते त्याला मिटींगमध्येही सोबत नेतात. गोवा हा भटका कुत्रा होता. रतनजींनी त्याला दत्तक घेतलं होते. असा करिश्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT