rashion card aadhar card link 
देश

रेशन कार्ड - आधार लिंक कसं करायचं? जाणून घ्या प्रक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - जवळपास सर्व सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या कागदपत्रांना आधार लिंक असणं गरजेचं आहे. यामध्ये पॅनकार्ड, बँक खातं याशिवाय रेशन कार्डचाही समावेश आहे. रेशन कार्ड देशातील रहिवाशी असल्याचा सर्वात आधीपासून वापरला जाणारा पुरावा आहे. याला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे कारण त्याचा वापर करून मिळणाऱ्या लाभाचा गैरवापर इतर कोणी करू शकणार नाही. गैरव्यवहार रोखण्यासाठी ही व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आधार कार्डला रेशन कार्ड लिंक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन प्रकारे करता येते. रेशन कार्डला आधार लिंक हे रेशनच्या दुकानात जाऊन करता येते. रेशन कार्ड आधारकार्डला लिंक केल्यानं अनेक प्रकारे मदत होईल. तसंच रेशन कार्ड शोधणं आणि आधार कार्डच्या नंबरवरून रेशन कार्डबाबतची माहिती मिळू शकेल. यासाठी लिंक करणं महत्वाचं आहे. 

रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स गरजेची आहे. याशिवाय कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट साइज फोटो लागतो. तुमचे बँक खाते आधारला लिंक नसेल तर तुमच्या बँक पासबूकची झेरॉक्स देऊन ते लिंक करता येईल. तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स आणि वरील कागदपत्रे रेशनच्या दुकानात द्या. रेशनच्या दुकानातील प्रतिनिधींकडून  तुमच्या आधार व्हेरिफिकेशनसाठी फिंगरप्रिंट घेतले जातील. कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर याची माहिती मेसेजच्या माध्यमातून दिली जाईल. तसंच दोन्ही कागदपत्रे यशस्वीरित्या लिंक झाल्यानंतर याचाही एक एसएमएस तुम्हाला येईल. 

कशी असते प्रक्रिया 

  • राज्याच्या PDS पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जा
  • रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाइल नंबर सबमिट करा.
  • तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी दिल्यानंतर रेशन कार्ड आधार कार्ड लिंकिंग प्रोसेस पूर्ण होईल. त्याबाबतचे मेसेज मोबाइलवर येतील.

रेशन कार्ड  सरकारी कागदपत्रांपैकी एक महत्वाची गोष्ट आहे. सरकारकडून देण्यात येणारं अनुदानित धान्य, इंधन यांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असते. जवळपास 50 वर्षांपूर्वी रेशन कार्ड सुरु करण्यात आले आणि भारतात अद्याप त्याचं महत्त्व कमी झालेलं नाही. कमी दरात धान्य देणं, याशिवाय गरीबांना देशात ओळखीचा दाखला आणि सरकारी डेटाबेसमध्ये रेकॉर्डसाठी याची मदत होते. तीन प्रकारचे रेशन कार्ड असतात. यामध्ये अंत्योदय, बीपीएल ( दारिद्र्य रेषेखालील) आणि एपीएल (दारिद्र्य रेषेवरील) यांचा समावेश आहे. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीनुसार हे प्रकार ठरतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत झळकावले होते शतक... २५६ धावांच्या खेळीत १४ षटकार, २९ चौकारांची आतषबाजी...

Numerology: न सांगताही ओळखतात मनातील भावना! लहानपणापासूनच 'सीक्रेट कीपर' असतात 'या' मूलांकाचे लोक...

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

Milk Adulteration : दूध भेसळ प्रकरण भरकटविण्याचा डाव; देवदत्त निकम यांच्यावरचे आरोप समर्थकांनी फेटाळले

SCROLL FOR NEXT