Ravi River Water esakal
देश

Ravi River Water: आर्थिक संकटाशी झुंजणारा पाकिस्तान पाण्यासाठी आसुसणार, रावी नदी पाणी प्रवाह पूर्णपणे बंद

Ravi River Water: यापूर्वी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या 1150 क्युसेक पाण्याचा आता जम्मू-काश्मीर क्षेत्राला फायदा होणार आहे. कठुआ आणि सांबा जिल्ह्यांतील 32,000 हेक्टर पेक्षा जास्त जमिनीला फायदा करून हे पाणी सिंचनासाठी वापरले जाईल.

Sandip Kapde

Ravi River Water: आर्थिक संकटाशी झुंजणारा शेजारी देश पाकीस्तान आता पाण्यासाठी आसुसणार आहे. शाहपूर कंदी धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रावी नदीच्या पाण्याचा पाकिस्तानकडे जाणारा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. शाहपूर कंदी बॅरेज पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवर आहे.

यापूर्वी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या 1150 क्युसेक पाण्याचा आता जम्मू-काश्मीर क्षेत्राला फायदा होणार आहे. कठुआ आणि सांबा जिल्ह्यांतील 32,000 हेक्टर पेक्षा जास्त जमिनीला फायदा करून हे पाणी सिंचनासाठी वापरले जाईल.

सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शाहपूर कंदी बॅरेज प्रकल्पाला गेल्या तीन दशकांमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आता 29 वर्षांनंतर शाहपूर कंदी बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये सिंधू जल करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, ज्या अंतर्गत रावी, सतलज आणि बियास (Beas River) नद्यांच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे, तर सिंधू, झेलम आणि चेनाब पाकिस्तानच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे.

शाहपूर कंदी बॅरेज बांधल्यानंतर रावी नदीचे पाणी राखून ठेवण्याचा अधिकार भारताला आहे. पूर्वी हे पाणी लखनपूर धरणातून पाकिस्तानकडे जात असे, मात्र आता या पाण्याचा फायदा पंजाब आणि जम्मू-काश्मीरला मिळणार आहे. (Latest Marathi News)

शाहपूर कंडी बॅरेज प्रकल्पाची पायाभरणी 1995 मध्ये माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी केली होती. या प्रकल्पाला जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब सरकारमध्ये अनेक वादांचा सामना करावा लागला, ज्यामुळे तो साडेचार वर्षांहून अधिक काळ स्थगित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ‘स्थानिक’मध्ये महायुतीच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमताचा विश्वास

Beed News : दिवाळी साजरी करताना हातातच फुटला फटाका; ६ वर्षाच्या मुलाला गमवावी लागली दृष्टी, बीडमधील दुर्देवी घटना...

Cracker Free Tamil Nadu Village: ना कर्णकर्कश्श आवाज, ना धूर...चैन्नईतील वेतांगुडीत पक्ष्यांसाठी फटाक्यांविना साजरी केली जाते दिवाळी

Crime: धक्कादायक! उपचारासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीसोबत संतापजनक कृत्य, मुलीनं सांगितली आपबिती, क्रूर डॉक्टर अटकेत

Latest Marathi News Live Update : मुस्लिम समाजाला जवळ करण्याचे दत्तात्रय भरणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT