Ravindra Gaikwad
Ravindra Gaikwad 
देश

बंदी मागे घ्या; अन्यथा पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू : शिवसेना

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या शिवसेनेने आता थेट 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या (एनडीए) भोजनाच्या कार्यक्रमावरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे गायकवाड यांना विमान कंपन्यांनी 'नो-फ्लाय लिस्ट'मध्ये टाकले. याविरोधात शिवसेनेने आज (गुरुवार) लोकसभेत गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, या प्रकरणी शिवसेनेच्या खासदारांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना घेरावही घातला होता. 

पुढील सोमवारी 'एनडीए'च्या सर्व घटकपक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतली नाही, तर पंतप्रधानांच्या कार्यक्रमावरच बहिष्कार घालण्याची भाषा आता शिवसेनेने सुरू केली आहे. शिवाय, 'मुंबईतून विमानांचे उड्डाण होऊ देणार नाही' अशी भूमिकाही शिवसेनेच्या काही नेत्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेनेने आजही लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. यात गायकवाड यांनी स्वत:ची बाजू मांडली. मात्र, अशोक गजपती राजू यांनी 'कुणाचेही नियमबाह्य वर्तन खपवून घेतले जाणार नाही' अशी ठाम भूमिका घेतली. 'विमान कंपन्यांनी केलेली कारवाई ही कुणा खासदाराविरोधात नाही. गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाविरोधात नियमानुसार कारवाई केलेली आहे,' असे विधान अशोक गजपती राजू यांनी केले. 

मंत्री साथ देत नसल्याचे पाहिल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनी त्यांना लोकसभेतच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. काही खासदारांनी राजू यांच्या टेबलवर रागाने आदळआपटही केली. अखेर स्मृती इराणी आणि जयंत सिन्हा यांनी राजू यांना शिवसेनेच्या खासदारांच्या गराड्यातून बाहेर काढले. 

लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दुपारी शिवसेनेचे खासदार आणि विमान वाहतूक सेवेच्या काही अधिकाऱ्यांची बैठक घेत या प्रश्‍नी तोडगा काढण्याची सूचना केली. तत्पूर्वी, 'तुम्हाला हवे असेल, तर या प्रश्‍नी तोडगा काढता येऊ शकतो. तुम्हाला हे प्रकरण वाढवायचे असेल, तर तसेही करता येऊ शकते,' अशा स्पष्ट शब्दांत राजू यांनी गायकवाड यांना 'एअर इंडिया'ची माफी मागावी लागेल, असे सांगितले. मात्र, 'संसदेची माफी मागेन; 'एअर इंडिया'ची माफी मागणार नाही' अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली. 'क्‍या औकात है 'एअर इंडिया'चे चेअरमन की? कौन है उसका चेअरमन? 'एअर इंडिया' क्‍या है? सब रिझॉल्व्ह हो जाएगा! देख लेंगे..' अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT