500 legal note  Esakal
देश

RBI Fact Check: 'ते' चिन्ह असलेल्या 500 रुपयांच्या नोटा बनावट आहेत का? रिझर्व्ह बँकेनं दिलं स्पष्टीकरण

RBI statement: ५०० रुपयांच्या नोटेवर छापण्यात आलेल्या स्टार चिन्हामागचं कारण आरबीआय़ने स्पष्ट केलं आहे. लोकांच्या मनात या चिन्हाला घेऊन संभ्रम होता.

सकाळ डिजिटल टीम

RBI on Debunked 500 rupee Note:भारतीय रिझर्व बॅंकेने ५०० रुपयांच्या नोटेबद्दल स्पष्टीकरण जाहीर केलंय. ज्या ५०० रुपयांच्या नोटेवर स्टार चिन्ह आहे त्या इतर नोटांप्रमाणेच कायदेशीर नोटा आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेलं स्टारचं चिन्ह ही त्या नोटीची वैधता दर्शवतं. रिझर्व बॅंकेकडून हा निर्णय तेव्हा घेण्यात आला जेव्हा, या चिन्हाबद्दल समाज माध्यमांवर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्पष्ट करण्याठी अधिकारिक घोषणा केली.

समाज माध्यमांवर ५०० रुपयांच्या नोटेवर स्टारचं चिन्ह असल्याने ती नोट नकली आहे, अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे नागरिकांमधील ही शंका दूर करण्यासाठी आरबीआयकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यांनी सांगितलं की या नोटादेखील बाकीच्या नोटांसारख्या वैध आहेत. नोटा पुन्हा प्रिंट झाल्याने त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.

आरबीआयच्या मते, स्टार हे चिन्ह काही नोटांवर छापण्यात आले होते. १०० नोटांच्या बंडलमध्ये ज्या नोटाची छपाई करताना त्यामध्ये त्रुटी आलेली, त्या नोटांऐवजी दुसऱ्या नोटा छापून त्यावर स्टार चिन्ह छापण्यात आले. जेव्हा आरबीआयला समजले की नोटांवर असलेल्या स्टारच्या या चिन्हामुळे या नोटा नकली आहेत आहेत,अशा अफवा पसरवल्या जात आहेत, तेव्हा आरबीआयने स्पष्टीकरण दिले. (Latest marathi News)

आरबीआयने दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितलंय की, ५०० रुपयांच्या नोटीवर नंबर पॅनलमध्ये प्रिफिक्स आणि नंबरमध्ये स्टार असेल ती नोटदेखील इतर नोटांप्रमाणे वैध आहे.

५०० रुपयांच्या नोटाही रद्द करण्यात येणार?

भारतीय रिझर्व बॅंकेने या वर्षाच्या मे महिन्यात २००० रुपयांच्या चलनी नोटा परत मागवल्या. या घटनेमुळे २०१६ साली झालेली ५०० आणि १००० रुपयांच्या नोटबंदीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे जास्त किंमत असणाऱ्या नोटा सरकार बंद करत आहे अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे मंत्रालयाने नागरिकांच्या मनातील ही भीती नष्ट करण्यासाठी सभागृहात भाष्य केलं. (Latest Marathi news)

सभागृहात काही खासदारांनी प्रश्न केला की, आता सरकार ५०० रुपयांच्या नोटाही बंद करणार आहे का ? यावर पंकज चौधरी यांनी नकारार्थी उत्तर दिलं आणि स्पष्ट केलं की सरकार आता जास्त किमतीच्या नोटा बंद करणार नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT