SBI Bank esakal
देश

RBIचा स्टेट बँकेला दणका! ठोठावला एक कोटींचा दंड

SBI ला पाठवली होती कारणे दाखवा नोटीस

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांचे पालन न केल्याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. व्यावसायिक बँकां आणि वित्तीय संस्थाद्वारे फसवणुकीचे वर्गीकरण आणि अहवाल न दिल्याबद्दल SBIवर ही कारवाई करण्यात आली आहे.

हा दंड बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या कलम 46 (4) (i) आणि 51 (1) सह कलम 47A (1) (c) च्या तरतुदीनुसार RBI मधील अधिकारांचा वापर करून लावण्यात आला आहे. नियमांच्या उल्लंघनावर आधारित ही कारवाई आहे. यामध्ये बँकेने त्याच्या ग्राहकांसह केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता स्पष्ट करण्याचा हेतू नाही.

RBIच्या माहितीनुसार, SBIकडे ठेवलेल्या ग्राहक खात्याची छाननी करण्यात आली होती आणि छाननी अहवालाची तपासणी आणि त्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहार, उघडकीस आलेल्या इतर गोष्टींबरोबरच निर्देशांचे पालन न करणे तसेच या खात्यातील फसवणुकीची माहिती आरबीआयला देण्यास विलंब केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.

पाठवली होती कारणे दाखवा नोटीस

यासंदर्भात, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये वरील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल त्यावर दंड का आकारला जाऊ नये? तसेच याचे कारण काय? अशी विचारणाही RBI कडे करण्यात आली होती. यानंतर वैयक्तिक सुनावणी, नोटीस आणि बँकेने दिलेल्या तोंडी उत्तराचा विचार करुन RBI या निष्कर्षापर्यंत पोहोचली की, वरील निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप पुरेसा असून त्यासाठी आर्थिक दंड लागू करणे योग्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT