RBI  esakal
देश

RBI चा कर्जदारांना दिलासा; रिकव्हरी एजंट्ससाठी नवीन सूचना जारी

आरबीआय कर्जाच्या वसुलीच्या मुद्द्यांवर वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करत असते.

सकाळ डिजिटल टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी वसुली एजट्सना नवीन सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार वसुली एजट्स आता कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकणार नाहीयेत.

या संदर्भात अधिसूचना जारी करताना RBI ने म्हटले आहे की, बँका, नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs) आणि मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (ARCs) यांनी कर्जाच्या वसुलीशी संबंधित त्यांच्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करणे गरजेच असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय, आरबीआयने कर्जदारांना कोणत्याही प्रकारचे अनुचित संदेश पाठवणे, धमकी देणे किंवा अज्ञात नंबरवरून कॉल टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरबीआय कर्जाच्या वसुलीच्या मुद्द्यांवर वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करत असते. नियमन केलेल्या संस्थांनी कर्जदारांना त्रास देऊ नये असे यापूर्वी म्हटले होते. परंतु अलिकडच्या काळात रिकव्हरी एजंट्सकडून होत असलेल्या अन्यायकारक कारवाया पाहता, आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व व्यावसायिक बँका, सहकारी बँका, NBFC, ARC आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थांना लागू होतील. RBI ला 1 एप्रिल 2021 ते 3 मार्च 2022 पर्यंत बँका आणि NBFC विरुद्ध 7,813 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर वरील सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कोणतीही बँक सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर वसुलीसाठी कोणतेही संदेश किंवा कॉल करू शकणार नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT