Reactions Of Bollywwod Stars On Child Rape In Kathua
Reactions Of Bollywwod Stars On Child Rape In Kathua 
देश

कठुआतील बलात्कार घटनेवर बॉलिवूड संतापले

सकाळ डिजिटल टीम

जम्मू काश्मीर मधील कठुआत जानेवारीत 8 वर्षांच्या मुलीवर सतत तीन दिवस बलात्कार करुन तिची हत्या कर्यात आली होती. कठुआत अल्पसंख्याक बकरावाल समाज आणि हिंदूमध्ये वाद आहे. या द्वेशातूनच हे कृत्य हिंदू ग्रामस्थांकडून केले असल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून नराधमांनी केलेले अत्याचार आरोपपत्रातून समोर आले आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर देशात सगळीकडेच संतापाचा लाट उसळली आहे. अशा घटनांची पुनःरावृत्ती होऊ नये यासाठी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी नवा कायदा आणणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली आहे. बॉलिवूड मधूनही प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेता फरहान अख्तर याने ट्विट करत म्हटले आहे की, रेप करणाऱ्याचा कोणताही धर्म नसतो. देवाची खरी भक्ती करणारे आणि देवाची भीती बाळगणारे कधीच असे कृत्य करु शकत नाही. ज्या लोकांनी हे दुष्कृत्य केले आहे त्यांना वाचवण्यासाठी देवाचा वापर केला जात आहे.
 


तर अभिनेत्री सोनम कपूर हिने ट्विटद्वारे म्हटले की, दिखाऊ भारतीय आणि दिखाऊ हिंन्दू यांना लाज वाटायला पाहिजे. मला विश्वासच बसत नाहीये की हे माझ्या देशात होत आहे. तसेच करण जोहर, अक्षय कुमार, दानिश हुसेन, रितेश देशमुख, रिचा चढ्ढा, कल्की कोचलीन, आहाना कुमरा, स्वरा भास्कर, हुमा कुरेशी, मीनी माथुर, श्रुती सेठ यांनी ट्विट करत या प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT