GDP Sakal
देश

GDP वधारला! पहिल्या तिमाहीत २०.१ टक्क्यांची वाढ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या महासाथी दरम्यान कोरोनाच्या दोन लाटांचा सामना करणारी देशाची अर्थव्यवस्था आता हळूहळू रुळावर येत आहे. आज मंगळवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपीचे नवे आकडे जाहीर केले आहेत. सध्याच्या आर्थिक वर्षांत २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच एप्रिल-जूनच्या आकडेवारीनुसार, जीडीपी विकास दर २०.१ टक्के राहिला आहे. हे आकडे चीनपेक्षाही उत्तम आहेत. कारण पहिल्या तिमाहीमध्ये चीनचा विकास दर ७.९ टक्के नोंदवला गेला होता.

जीडीपीचे आकडे कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती दर्शवत असतात. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी वजा २४.४ टक्क्यांनी घसरला होता. जीडीपीची वाढ मोजण्यासाठी या आधीच्या वर्षातील कालवधीची तुलना केली जाते. गेल्या वर्षी करोना संकटामुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने जीडीपी घसरण नोंदवण्यात आली होती.

गेल्या वर्षी देश कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करत होता, तेंव्हा भारतात जगातील सर्वांत मोठा आणि कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळेच गेल्या आर्थिक वर्षांत २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये विकास दर नकारात्मक झाला होता. तेंव्हा हा आकडा -२४.४ टक्के नोंदवण्यात आला होता.

असे बदलले आकडे

  • आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये -२४.४ टक्के

  • २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहीत -७.४ टक्के

  • तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था निगेटीव्ह ग्रोथमधून बाहेर आली. विकासदर ०.५ टक्के नोंदवला गेला.

  • गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत १.६ टक्के नोंदवला गेला.

  • सध्याच्या आर्थिक वर्षांच्या २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहित म्हणजेच एप्रिल-जूनमध्ये तो वाढून २०.१ टक्के झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात; सहाशेपेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी उचललं, आकाशवाणीजवळ दगडफेक

Balinga Dhonwade Road : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील दोनवडे-बालिंगा रस्त्याचे काम अपूर्ण; प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, कधी पूर्ण होणार काम?

मुंबईची मुलगी... रियाच्या घरी पोहोचले पोलीस! CJP आंदोलनाची केली चौकशी अन्... नेमकं काय घडलं? Video

Marathi News Live Updates : दिल्लीनंतर आता मुंबई-पुण्यातही आंदोलकांची धरपकड, १५० जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

''ज्या देशाने परकियांचा माज उतरवला, तिथे स्वकियांचा माज जनता उतरवणार नाही वाटतं का?'' राज ठाकरे संतापले...

SCROLL FOR NEXT