Nipah Virus esakal
देश

Nipah Virus : 'निपाह' व्हायरस पसरण्याची कारणं काय ? फळांना व्हायरस बॉम्ब बनवतो हा फ्रूटबॅट..

निपाह विषाणू प्रामुख्याने फ्रूट बॅटद्वारे पसरतो

सकाळ डिजिटल टीम

Nipah Virus : निपाह विषाणू प्रामुख्याने फ्रूट बॅटद्वारे पसरतो. त्यांना मेगा बॅट असेही म्हणतात. हे वटवाघुळ फक्त फळं आणि फुलं खातात आणि त्यांच्या लाळेतून फळांवर विषाणू सोडतात. हा विषाणू माणसाच्या संपर्कात येताच निपाह रोगाचा शिकार ठरतो.

देशात पुन्हा एकदा निपाह विषाणूचे प्रकरण समोर आले आहे. केरळच्या कोळिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसमुळे 2 जणांच्या मृत्यूनंतर सरकार अलर्ट मोडवर असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. संशयितांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय, लोकांनी सावधगिरी बाळगावी आणि लक्षणे दिसल्यास ताबडतोब रुग्णालयात यावे, असा सल्लाही जारी करण्यात आला आहे.

निपाह हा एक झुनोटिक विषाणू आहे, जो फ्रूट बॅट म्हणजेच वटवाघळांद्वारे पसरतो. ही वटवाघुळ शाकाहारी असतात, ज्यांना मेगा बॅट असंही म्हणतात. हे वटवाघुळ कोणत्याही फळावर बसल्यास किंवा ते खाल्ल्यास निपाह विषाणू फळांमध्ये प्रवेश करून मानवापर्यंत पोहोचतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनयझेशनच्या म्हणण्यानुसार, निपाह व्हायरसची ओळख सर्वप्रथम मलेशियातील सुंगई निपाह गावात 1998 मध्ये झाली होती, म्हणूनच या विषाणूला निपाह असे नाव देण्यात आले आहे.

'निपाह' व्हायरस पसरण्याची कारणं?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 'निपाह' व्हायरसचा संसर्ग वटवाघूळं आणि डुकरांपासून माणसांना होतो.एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते.फ्रूट बॅट्स म्हणजे फळं खाणारी वटवाघूळं 'निपाह' व्हायरसचे नैसर्गिक वाहक असतात.मेगा बॅट म्हणजेच फ्रूट बॅट वटवाघुळं टेरोपस कुटुंबातील असून ज्याच्या सुमारे 197 प्रजाती आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बहुतेक प्रजाती पूर्णपणे शाकाहारी आहेत. म्हणजेच ते फळं खाऊन आपली भूक भागवतात.

तज्ञांच्या मते, हा व्हायरस मलेशियातील टेरोपस व्हॅमपायरस प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये सापडतो. ही प्रजाती भारतात सापडत नाही. निपाह व्हायरस वटवाघुळांच्या लाळेमध्ये असतो. वटवाघुळांनी खालेल्ली उष्टी फळं माणसांनी खाल्ली, तर, व्हायरस आपल्या शरीरात जातो. हे फळ इतर फळांसोबत ठेवल्यावर त्यांच्यातही विषाणू पसरतो.

हृदय एका मिनिटात 700 वेळा धडकू शकते

मेगा वटवाघळांच्या काही प्रजाती खूप मोठ्या असतात, त्यांचे वजन दीड किलोपेक्षा जास्त असते. परंतु सर्वच वटवाघुळ मोठे नसतात. ज्या वटवाघळाला निपाह विषाणूस कारणीभूत धरलं जातं त्याचं वजन सुमारे 50 ग्रॅम असतं. त्यांचा चेहरा कुत्र्यासारखा असतो. असं वाटतं की ते नखांच्या साहाय्याने झाडांवर उलटे लटकलेले आहेत. उडताना पण ते ऑक्सिजन वेगाने घेतात. वेगाने उड्डाण करत असताना, त्यांचे हृदय मिनिटाला 700 ठोक्यांपेक्षा पेक्षा जास्त वेळा धडकते.

वासाने फळापर्यंत पोहोचणे

मेगा बॅटच्या बहुतेक प्रजाती संध्याकाळी आणि रात्री उडतात. दिवसा ते झाडांमध्ये किंवा गुहांमध्ये राहतात. ब्रिटानिकाच्या अहवालानुसार, फ्रूट बॅटच्या काही प्रजाती एकांतात राहतात. काही हजारो वटवाघळांच्या गटात राहतात, ते फळांच्या वासाने त्यांच्यापर्यंत पोहोचतात. फळांव्यतिरिक्त ते फुले, पाने, डहाळ्या आणि झाडाची साल देखील खातात.

वटवाघळाला स्वतःला संसर्ग का होत नाही?

निपाह विषाणू वटवाघुळांमध्ये नेहमीच असतो. परंतु त्यांना स्वतःला त्याचा संसर्ग होत नाही. याचे कारण त्यांच्या अँटीबॉडीज आहेत. गेल्या 15 वर्षांपासून निपाह व्हायरसवर संशोधन करणाऱ्या प्रोफेसर लुबी यांच्या म्हणण्यानुसार, फ्रूट बॅटचे ऍन्टीबॉडीज ही त्यांची ढाल आहेत. वटवाघळांमध्ये ते सुप्त अवस्थेत असतात. परंतु जेव्हा ते फळ खातात तेव्हा विषाणू फळांमध्ये पोहोचतो. केरळमध्ये अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत कारण दक्षिणेकडील राज्यांमध्ये फ्रूट बॅटचे प्रमाण जास्त आहे.

निपाह संसर्गाची लक्षणं काय?

ताप, डोकेदुखी, कफ, घसादुखी आणि श्वास घेण्यात अडथळा ही निपाह संसर्गाची लक्षणं आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया आणि मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. निपाहचा विषाणू शरीरात गेल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी 4 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. RT-PCR टेस्ट करून निपाह व्हायरस संसर्गाचं निदान करण्यात येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT