corona 
देश

देशात कोरोनाचा दुहेरी विक्रम ; एकाच दिवसात ९० हजार नवे रुग्ण 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस तीव्र होत असून शनिवारी एका दिवसात विक्रमी ९०, ६३२ रुग्ण आढळले. त्यामुळे, भारतातील एकूण कोरोना रुग्णांनी ४१ लाखांचा टप्पा ओलांडला. मात्र, यापैकी जवळपास ३२ लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी एकाच दिवसात ७३, ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यामुळे, देशाचा कोरानामुक्तीचा दर आता ७७ टक्क्यांवर पोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आत्तापर्यंत कोरोनामुळे ७०,६२६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा मृत्यूदरही आणखी घसरून १.७२ टक्क्यांवर आला आहे. भारतात कोरोना रुग्ण वाढत असले तरी देशाचा मृत्यूदर मात्र जगात सर्वांत कमी मृत्यूदरांपैकी एक आहे, ही बाब दिलासादायी आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कोरोनाच्या रुग्णांचे निदान प्राथमिक टप्प्यात होत आहे. त्यासाठी, उच्चस्तरीय चाचण्यांचा वापर केला जात असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेबरोबर देशभरातील अतिदक्षता विभागातील डॉक्टरांचे वैद्यकीय व्यवस्थापनाचे कौशल्य अद्ययावत करत आहे, त्यामुळे, मृत्यूदर घटविण्यात भारताला यश आल्याचा दावाही मंत्रालयाने केला. 

कोरोनावर एक नजर 
एकूण रुग्ण - ४१ लाख 
सक्रिय रुग्ण - ८,६२,३२० 
कोरानामुक्त रुग्ण  - ३२ लाख 
मृत्यूदर - १.७२ टक्के 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT