Rupees 
देश

देशातील चार राज्यांतून निवडणुकीपूर्वीच विक्रमी ३३१ कोटी रुपये जप्त

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात विधानसभा निवडणुका होणाऱ्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विक्रमी ३३१ कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक खर्च देखरेख प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही कारवाई केली. या राज्यांमध्ये २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षाही ही रक्कम मोठी आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष निवडणुक सुरू होण्याआधीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त करण्यात आल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तमिळनाडूत सर्वाधिक म्हणजे १२७. ६४ कोटी रुपये जप्त करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचप्रमाणे, पश्चिम बंगालमधून ११२.५९ कोटी रुपये जप्त केले. या दोन्ही राज्यांसह आसाम, केरळ व पुदुच्चेरीत काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने २९५ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे, पाच विशेष निरीक्षकही नेमले आहेत. निवडणूक खर्चाच्या अधिक प्रभावी देखरेखीसाठी यापूर्वीच्या कामाचे निर्दोष रेकॉर्ड असलेले अधिकारी नियुक्त केले जातात. एकूण मतदारसंघांपैकी २५९ मतदारसंघ खर्चाच्या दृष्टिने संवेदनशील ठरविण्यात आले आहेत. कायद्यानुसार निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदारांना रोख रक्कम, भेटवस्तू देण्यास परवानगी नाही. मात्र, उमेदवारांकडून पैसे, मद्य किंवा इतर वस्तू मतदारांना दिल्या जातात. हे कृत्य लाचखोरीत गृहित धरले जाते. भादंवि १७१ ब आणि लोकप्रतिनिधी कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविला जातो.

जप्त केलेली रक्कम (आकडे कोटी रुपयांत)
तमिळनाडू - १२७.६४
पश्चिम बंगाल - ११२.५९

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Hingoli Traffic Congestion: हिंगोलीकरांची वाहतूक व्यथा: कोंडी, पार्किंग नसणे आणि धूळखात सिग्नल; गांधी चौक ते रिसाला बाजार

SCROLL FOR NEXT